जे.एस.डब्ल्यू. प्रा.;लि. यांची सामाजिक बांधिलकी कौतुकाची


 जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमा करिता आवश्यक साहित्याचे मा. जिल्हाधिकारी रायगड डॉ. विजय सूर्यवंशी यांचे हस्ते केले हस्तांतरण

"Know your status (आपली एचआयव्हीची सद्यस्थिती जाणून घ्या)" कार्यक्रम होणार गतीमान

 म्हसळा प्रातिनिधी     
 जिल्हाधिकारी रायगड डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या  जिल्हा एड्स प्रतिबंध कमिटीच्या सभेमधील  सूचनेनुसार सामाजिक  बांधिलकीतून. जे.एस.डब्ल्यू. प्रा.;लि. डोलवी, ता. पेण या कंपनीने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग (डापकु) रायगड अंतर्गत आयसीटीसीकरीता एच.आय. rव्ही तपासणी करणे करीता  अत्यंत आवश्यक निडल विथ सिरींजेस ७५,०००, टेस्ट ट्यूब/pathozyme  plast   ५०,००० व यल्लो टिप्स ५०,००० इतक्या साहित्याचा पुरवठा करून  एचआयव्ही एड्स कार्यक्रमामध्ये मोलाचे सहकार्य केले आहे. सदर साहित्याचा हस्तांतरण सोहळा आज दिनांक ०८/०२/२०१९ रोजी राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग येथे  मा. जिल्हाधिकारी रायगड डॉ. विजय सूर्यवंशी व  मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी  यांच्या शुभहस्ते   तसेच सीएसआर विभाग प्रमुख श्री. विनायक दळवी, सीएसआर ज्युनिअर मॅनेजर श्रीम. संहिता चॅटर्जी  जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री. संजय माने व डापकु कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.           सीएसआर विभाग प्रमुख श्री. विनायक दळवी यांचे मार्गदर्शनाखाली सीएसआर ज्युनिअर मॅनेजर श्रीम. संहिता चॅटर्जी  यांच्या  पुढाकाराने व  जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री. संजय माने, श्री. नवनाथ लबडे, जिल्हा पर्यवेक्षक, श्री रविंद्र कदम जिल्हा सहाय्यक लेखा, डापकू, रायगड यांच्या पाठपुराव्यामुळे प्रस्तुत साहित्य प्राप्त झाले॰ जे.एस.डब्ल्यू. प्रा.;लि. डोलवी, ता. पेण यांनी केलेल्या या अनमोल सहकार्यामुळे रायगड जिल्ह्यातील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग (डापकु) रायगड अंतर्गत असलेल्या जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका दवाखाना या स्तरावर कार्यरत असणाऱ्या आयसीटीसी याना एचआयव्ही तपासणी करणे करीता मदत होणार आहे. मा. प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी वडाळा, मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार know your status (आपली एचआयव्हीची सद्यस्थिती जाणून घ्या) या ब्रीद वाक्यानुसार इच्छुक असणाऱ्या व्यक्तींची तसेच विविध कंपन्यांमध्ये व बांधकामाच्या ठिकाणी आलेल्या  स्थलांतरित कामगार, ट्रक ड्रायव्हर, वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, गरोदर माता, अतिजोखमीचे गट यांची तपासणी करणेकरीता मदत होणार आहे.      यापूर्वी  जे.एस.डब्ल्यू. प्रा.;लि. डोलवी, ता. पेण या कंपनीने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग (डापकु) रायगड अंतर्गत मोबाईल आयसीटीसी व्हॅनचे डिजिटलाझेशन, एचआयव्ही एड्स जनजागृतीपर ऑर्केस्ट्रा व पथनाट्य  सादरीकरण तसेच एचआयव्ही एड्स विषयी माहिती, मार्गदर्शन, प्रदर्शन करून समुपदेशन व तपासणी शिबिरअशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करून एचआयव्ही एड्स प्रतिबंधाकरिता विशेष सहकार्य केलेले आहे.        जे.एस.डब्ल्यू. प्रा.;लि. डोलवी, ता. पेण या कंपनीच्या सीएसआर विभागामार्फत होत असलेल्या नाविन्यपूर्ण सहकार्याबद्दल मा. जिल्हाधिकारी रायगड डॉ. विजय सूर्यवंशी व  मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी सीएसआर विभाग प्रमुख श्री. विनायक दळवी व सीएसआर  ज्युनिअर मॅनेजर श्रीम. संहिता चॅटर्जी यांचा गौरव करून विशेष आभार व्यक्त केले. तसेच यापुढेही  एचआयव्ही एड्स प्रतिबंध कार्यक्रमाकरिता असेच सहकार्य मिळावे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा