श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी श्रीवर्धन तालुक्यात पाऊस कमी प्रमाणात झाला त्यामुळे तालुक्यातील धरणात मुबलक प्रमाणात पाणी संचय झालेला नाही .परिणामी तालुक्यातील जनतेच्या पेयजलचा प्रश्न उपस्थित होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत .पशुधन ,शेती व पर्यटन या तिन्ही बाबीवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील रानवली धरण शहर व जवळपास च्या खेडेगावसाठी महत्वाचे आहे .रानवली धरणाची पाणी साठवण क्षमता 2.25 दशलक्ष घन मीटरच्या सुमारास आहे . श्रीवर्धन शहरासाठी आरक्षित पाणी साठा 48 दशलक्ष आहे . आराठी ,जसवली या ग्रामपंचायती व श्रीवर्धन नगरपालिका हद्दीतील सर्व रहिवाशांना रानवली धरणातून पाणी पुरवठा केला जातो . पावसाळ्यात नगरपालिका हद्दीत 87.94 इंच पाऊस पडला होता . श्रीवर्धन नगरपालिकेच्या हद्दीत 4900 घरे असून .आजमितीची श्रीवर्धन शहराची लोकसंख्या 15520 च्या जवळपास आहे .शासन नियमानुसार दरडोई 135 लीटर पाण्याची तरतूद आहे .आजमितीस प्राप्त माहिती नुसार 4 कोटी 14 लाख लिटर पाणी रानवली धरणात शिल्लक आहे .जानेवारी महिन्यात वातावरणात थंड हवेचे प्रमाण जास्त होते .फेब्रुवारी च्या पहिल्याच आठवड्यात वातावरणात कमालीचा बदल झाला आहे त्या कारणे बाष्पीभवनाची प्रक्रिया जोर पकडून पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता वाढली आहे. उपलब्ध पाणी जुन च्या पहिल्या आठवड्या पर्यंत पुरवण्याचे दिव्य नगरपालिका प्रशासनास करणे कठीण ठरणार आहे. श्रीवर्धन शहर व तालुक्यातील पाण्याचे इतर नैसर्गिक स्रोत निष्क्रिय ठरत आहेत. श्रीवर्धन शहरात जवळ पास सार्वजनिक 35 विहिरी आहेत परंतु त्यानी सर्वांनी आताच जवळपास तळ गाठला आहे .श्रीवर्धन प्रवेशद्वारा जवळ भुवनाळे तलाव , जसवली फाट्याच्या लगत जसवली तलाव , भोस्ते तलाव व नगरपरिषद इमारतीच्या पाठीमागील बाजूस उजाड अवस्थेत तलाव आहे परंतु या चार ही तलावाचा काहीच उपयोग व वापर नाही . तालुक्यातील खेडे गावातील व वाड्यावस्त्यावरील विहरींच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे . अनेक विहिरी दुर्लक्षित आहेत .त्यामुळे स्वच्छ व निरोगी पाणी मिळणे कठीण आहे. खेडेगावातील अनेक हातपंप बंद अवस्थेत गंजत पडलेले आहेत .चालू हातपंपा तून पाणी उपलब्ध होणे कठीण व कष्टाचे काम आहे .दुष्काळ सदृश्य परिस्थितीने सर्व विदारक व भयाण चित्र निर्माण केले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील पशुधन संगोपन करणे महत्कार्य ठरत आहे .कारण जनावरांना चारा उपलब्ध नाही .सर्वत्र दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत .भात कापणी नंतर शेत उजाड झाली आहेत .लोकांना रोजगार निर्मिती चा कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याने तरुण पिढी उदरनिर्वाह साठी मुंबई कडे धाव घेण्याचे प्रमाण वाढले आहे.
दुष्काळाचे पडसाद पर्यटन व्यवसायावर पडण्याची लक्षणे निदर्शनास येत आहेत .
गेल्या वर्षी तालुक्यातील साक्षी भैरी (हरेश्वर) , वडशेतवावे , गुलदे ( कासार) कोंड ,शेखार्डी या गावांना गेल्या वर्षी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.या वर्षी तालुक्यात 2301 मिली मीटर पाऊस पडला आहे. श्रीवर्धन तालुक्यात अपेक्षित पाऊस 3218आहे .मात्र प्रत्यक्षात 71.50%च पाऊस पडला आहे. त्या कारणे प्रमाण कमी असल्याने पाणी टंचाई चे संकट लवकरच निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत .
श्रीवर्धन नगरपरिषद पाणी प्रश्नी सजग व जागृत आहे .आम्हांला आशा आहे की साधारणतः रानवली धरणातील पाणी पुरवठा पावसाळ्या च्या कालावधी पर्यंत पुरेल .अन्यथा त्या प्रश्नी तात्काळ उपाय योजना केल्या जातील ......किरणकुमार मोरे (मुख्याधिकारी श्रीवर्धन नगरपरिषद )
श्रीवर्धन तालुक्यात या वर्षी पर्जन्याचे प्रमाण कमी आहे त्या कारणे तालुक्यात पाणी प्रश्नी टँकरची मागणी करणाऱ्या गावांना तात्काळ टँकर चा पुरवठा केला जाईल .तालुक्यातील पाणी प्रश्नी प्रशासन संवेदनशील आहोत . ...जयराज सुर्यवंशी (तहसीलदार श्रीवर्धन)
श्रीवर्धन पंचायत समितीने पाणी प्रश्नी आराखडा जिल्हाधिकारी कार्यालया कडे पाठवला आहे .त्यास मंजुरी प्राप्त झाल्यानंतर टंचाई ग्रस्त गावांना तात्काळ पाणी पुरवठा करण्याची तरतूद केली जाईल ....मंगेश कोबनाक ( पंचायत समिती सदस्य श्रीवर्धन )
दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने त्या संदर्भात आराखडा तयार आहे .रानवली धरणातून पाणी पुरवठा खंडित झाल्यास तात्काळ पर्यायी उपाय योजना तयार असतील .नागरिकांना कुठल्याही प्रकारचा पाणी प्रश्नी त्रास होणार नाही.... नरेंद्र भुसाने (नगराध्यक्ष श्रीवर्धन नगरपरिषद )
दुष्काळी परिस्थिती मुळे नैसर्गिक स्त्रोता मध्ये कमालीची घट झाली आहे .नगरपालिका प्रशासन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम आहे . नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती आहे .....दर्शन विचारे (नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष)



Post a Comment