कला प्रतिनिधी : म्हसळा लाईव्ह
विजय आणि दुर्वास या पयकोळी बंधूंची पुन्हा एकदा कलावंत म्हणून कलर्स मराठी या मराठी वाहिनीवरील एकदम कडक या कार्यक्रमात हजेरी लावली.
म्हसळा तालुक्यातील नामवंत गायक विजय पयकोळी आणि गीतकार दुर्वासदादा पयकोळी यांनी कलर्स मराठी वरील एकदम कडक या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध लोककला सादर करणाऱ्या कलावंतांच्या समवेत उपस्थिती लावली. एकदम कडक या प्रक्षेपानाद्वारे आपल्या म्हसळा तालुक्यातील दोन कोकण पुत्र आपल्या सहकार्यांच्या साथीने आणि मुलींच्या डान्स द्वारे लोककला सातत्याने दाखवत असतात. म्हसळा तालुक्याच्या नावाची छाप महाराष्ट्राच्या कानाकोपर्यावर सोडणाऱ्या या पयकोली बंधूनी अनेक भावगीते, कोळीगीते, शक्तीतुरा गीते सतत सदर करत झाकरी नृत्याने आजवर नावलौकिक मिळवला. तालुक्यासह कोकण चे नाव रोषण करणाऱ्या या जोडीवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय.

Post a Comment