गोंडघर ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी होणार चुरस.



तालुका भाजपाचे उप-अध्यक्षांचा राजीनामा .

संजय खांबेटे : म्हसळा
     म्हसळा तालुक्यातील चार ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे गोंडघर, खामगाव व खारगांव (बु.)ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना मध्ये थेट लढत होणार आहे. रोहीणी ग्रामपंचायत बिनविरोध होण्याकडे कल आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शेकापची अघाडी आहे.तर शिवसेनेला काँग्रेसची साथ आहे , खामगांव, रोहीणी व गोंडघर ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी कडे तर  एकमेव खारगाव बु.ग्रा पं सेनेकडे आहे.तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शेकापची अघाडीचे वर्चस्व आहे.

      बहुतांश ग्रामपंचा यतींत सदस्य पदासाठी विशेष स्पर्धा नसली तरी थेट सरपंच पदाचे लढतीत प्रचंड स्पर्धा होण्याचे संकेत आहेत. गोंडघर ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाचे निवडणुकीत राजकीय स्थित्यंतरे झाली आहेत. स्थानीक सर्व प्रकारच्या चळवळींत नेहमी आघाडीवर असणारे व भाजपाचे तालुका उप-अध्यक्ष लहू तुरे यानी  पक्षाचा राजीनामा वरीष्ठांकडे दिला आहे. ते सरपंच पदाचे शर्यतीत स्थानिक गाव विकास आघाडी कडून निवडणूक लढवीत आहेत.गोंडघर ग्रामपंचायतीत शेका पक्षाचे विद्यमान सरपंच स्वप्नील बिराडी व संदीप पाटील यानी, शिवसेने कडून प्रज्ञा भुवड व स्थानिक गाव विकास आघाडीचे लहू तुरे व  अनंत चापेटकर हे अपक्ष लढत आहेत. थेट सरपंच हे  लढतीचे केंद्र होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा