संजय खांबेटे : म्हसळा
संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना , इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना समितीची बैठक प्रकाश रायकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली या सभेला सदस्य सचिव तथा तहसीलदार शरद गोसावी , सदस्य प्रकाश कोठावळे, अनिल टिंगरे, यशवंत म्हात्रे, यशवंत आवेरे, ग.वि.अ.चे प्रतिनिधी चौधरी , नायब तहसीलदार के.टी. भिंगारे,अ.का. विशाल भालेकर, गोवींदराव चाटे, श्रीमती सरिता निमकर, नुतन गोविलकर आदी उपस्थित होते. यावेळी १५ लाभार्थींच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये संजय गांधी अपंग योजनेचे ४ लाभार्थी ( प्रतिमहा रु ८००),संजय गांधी विधवा योजनेचे २ लाभार्थी ( प्रतिमहा रु ६००), इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना ४ लाभार्थी ( प्रतिमहा रु ६००), श्रावणबाळ योजनेचे ५ लाभार्थी ( प्रतिमहा रु ६०० ) अनुदान देण्यात येणार आसल्याचे भालेकर यानी सांगितले.
मंजुर झालेले लाभार्थी पुढील प्रमाणे.
संजय गांधी अपंग योजना
१ ) पुष्पा नारायण सुभेदार (खरसई )
२) अफ्रा अब्दुल वहिद काजी ( म्हसळा )
३) उत्तम भिकुराम शिंदे ( पाष्टी)
४) सुरेखा शांताराम साळुंखे ( मेंदडी)
संजय गांधी विधवा योजना
१) पार्वती नथुराम नाक्ती (काळसुरी)
२) जयवंती गणपत पेंढारी( सोनघर)
इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना
१)पार्वती हिराजी चाळके (काळसुरी)
२) सरिता नथुराम धोंडगे (संदेरी)
३) सुरेखा बाबू फणसे (चिखलप )
४) देवकी चंदर घोसाळकर (काळसुरी)
श्रावणबाळ योजना
१) आनंदी गोविंद चिबडे ( संदेरी )
२) काशीबाई रामभाऊ वारगे ( काळसुरी)
३)भिमा गंगाराम भेकरे (भेकऱ्याचा कोंड )
४) लक्ष्मी गोविंद डावरुंग (संदेरी)
५) रमाबाई महादेव शिगवण (संदेरी).

Post a Comment