संजय खाबेटे : म्हसळा
कवी कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा दिवस! कुसुमाग्रजांना मराठी साहित्यातील योगदानाबद्दल १९८८-८९ मध्ये भारतातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.याच दिवसाचे गांभीर्य ठेऊन वाचनालयांची वाचक व सदस्य संख्या वाढावी म्हणून सार्वजनिक वाचनालय म्हसळे येथे बुधवार दि. २७/०२/२०१९ रोजी वि.वा शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे पूजन वाचक व्ही. सी. सोनवणे यांच्या हस्ते व सरस्वती पूजन पी. एम. करडे (सा. वा. म्हसळे सदस्य) यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी सा. वा. म्हसळे अध्यक्ष श्री. संजय के. खांबेटे, श्री. बी.पी.कदम, श्री.जी.जी. पारावे,श्री. दामोदर गुरव, श्री. प्रवीण जोशी, श्री.व्ही.भदाणे, प्रगती केदार, आशा मोहिते, श्री. डी.पी.सरनाईक, श्रीम.व्ही एम चव्हाण, श्री.एम पाटील, श्री.एस शेंडगे, आर.एस.मानटे भाग्यश्री चौलकर, वाचनालयाचे ग्रंथपालश्री.उदयकरडे, , श्रीम.सायली चोगले, धनश्री नाक्ती व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ग्रंथपाल करडे यानी
‘माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका’,
‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतिचाही दिवा विझे;
गुलामभाषिक होऊनी अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका’
या त्यांच्या काव्यपंक्तींतून वि.वा. शिरवाडकरांचे मराठी-प्रेम दिसून येते. कुसुमाग्रजांचे साहित्यातील योगदान व त्यांचे भाषा-प्रेम यांचा विचार करता जागतिक मराठी परिषदेच्या वतीने त्यांचा जन्मदिवस (२७ फेब्रुवरी) ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला अशी उद्बोधक माहीती दिती. ग्रंथालयाचे कर्मचारी वर्गानी साखळी वाचनालयाची मोठ्या प्रमाणावर जनजागृती विविध शाळांतून करण्याबाबत वाचक वाढीचा संकल्प सोडला.

Post a Comment