म्हसळयात पाकीस्तान वरील हवाई हल्ल्याचे जल्लोषात स्वागत : पाकीस्तान मुर्दाबाद च्या नाऱ्याने म्हसळा शहर दुमदुमले



संजय खांबेटे : म्हसळा 
भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकीस्तानच्या
बालकोट भागात केलेल्या हवाई हल्ल्याबाबत म्हसळा करानी आनंद व्यक्त केला. शहरांतील सोशल मिडीया मार्फत आनंद व्यक्त होत असतानाच असल कादरी, सुवेल हवलदार , नईम दळवी, खालीद काजी , सुबान हळदे , अकमल कादरी या युवकानी नेतृत्व करीत म्हसळा शहरातून भारतीय हवाई दलाचा जयजयकार केला. त्याच सोबत भारत झिंदाबाद, पाकीस्तान मुर्दाबादच्या घोषणा नी म्हसळा शहर दणाणून सोडले. युवकानी आपल्या विजयीची रॅलीची समाप्ती म्हसळा तहसीलच्या प्रांगणात राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाला प्रणाम करुन केली रॅलीतील सर्व युवकांच्या चेहऱ्यावर पाकीस्तान वरील  हवाई हल्ल्याच्या मुळे  प्रचंड विजयी आनंद जाणवत होता.

शहरात व्हॉट्स अॅप गृपवर सतत च्या मेसेजने होत होता कौतुक सोहळा

पाकिस्तानने लष्कराने व पंतप्रधान इम्रान खानने "आभ्यास केला आर्मीचा आणि पेपर आला एअरफोर्सचा"
पंतप्रधान इम्रान खानने  भी पाक सेना को दी खुली छूट , "कहाँ की कहाँ से भी जगह मिले , भाग लेना"

 अशा पद्धतीच्या विविध संदेशानी सर्वच जण हवाई दलाचे वेगवेगळे फोटो टाकीत  कौतुक करीत होते .


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा