पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना लाभार्थी व्यक्ती पर्यंत पोहचवा :-प्रवीण पवार प्रांताधिकारी श्रीवर्धन



प्रांतकार्यालयात अधिकारी वर्गाचे प्रशिक्षण संपन्न
श्रीवर्धन प्रतिनिधी :संतोष सापते
श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील प्रत्येक लाभास पात्र शेतकऱ्यां पर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पोहचवणे आपले कर्तव्य आहे .या योजने अंतर्गत येणाऱ्या सर्व बाबी व निकष सर्वसामान्य व्यक्तीस समजावून सांगा व त्यांच्या मनातील शंकाचे निरासन करून सदरची योजना यशस्वी करा असे प्रतिपादन प्रवीण पवार प्रांताधिकारी यांनी अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणात केले.

पंतप्रधान किसान  सन्मान निधी योजनेसाठी शेतकरी वर्गास गरजेचे असलेले सर्व कागदपत्रे ,निकष ,शेतजमिनी संदर्भातील मर्यादा याची सविस्तर माहिती आपणांस  देण्यात आली आहे .आजमितीस महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. सर्वसामान्य  भूमी धारकांना सदर योजने मुळे निश्चितच फायदा मिळणार आहे.तालुक्यातील पाच एकर पेक्षा कमी जमीन धारक व योजने तील निकषात पात्र  एक ही व्यक्ती योजने पासून वंचित राहणार यांची जबाबदारी आपणा सर्वांची आहे .असे प्रवीण पवार यांनी सांगितले .सदर प्रशिक्षणा साठी  श्रीवर्धन तहसीलदार जयराज सुर्यवंशी ,म्हसळा तहसीलदार रामदास झळके, रामभाऊ गिरी ,सर्व मंडळ अधिकारी, तलाठी ,ग्रामसेवक व इतर शासकीय अधिकारी सदरच्या प्रशिक्षण प्रसंगी हजर होते .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा