राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंर्तगत म्हसळयात रु २ .४० लक्ष अनुदान वाटप.

फोटो: सरिता दशरथ काते ( सावर) याना अनुदानाचा चेक वाटप करताना तहसीलदार रामदास झळके, महसूल अ.का. सचिन धोंडगे, संजय गांधी योजना अव्वल कारकून विशाल भालेकर, म्हसळा तलाठी कैलास पाटील व श्रीमती लिमकर.


संजय खांबेटे : म्हसळा 
केंद्र शासनाचे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने मध्ये कुटुंबातील " महिला" या घटकास देखील " कमावती व्यक्ती " या योजने 
 अंर्तगत म्हसळयात आजपर्यंत १२ लाभार्थीना  रु २ .४० लक्षचे वाटप करण्यात आल्याचे तहसीलदार रामदास झळके यानी वार्तालाप करताना सांगितले. या योजने अंतर्गत दारिद्री रेषेखातील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमवत्या व्यक्तीचा अकस्मात मृत्यु झाल्यास( नैसर्गिक वा इतर कोणत्याही पध्दतीने) त्यांच्या वारसास एकरकमी रु. २००००/ इतके अर्थसहाय्य केंद्र शासना मार्फत देण्यात येत आसल्याचे झळके यानी सांगितले .
   तालुक्यात जून २०१८ ते जाने २०१९ या काला बधीत वनिता हरीचंद्र कोकाटे, (खरसई), स्वाती संदेश पवार , ( मांदाटणे), कोमल केतन गोपाळे ( म्हसळा ), निकिता नितीन भुवड (कणघर), अनिता अनंत कातकर ( गोंडघर ),मिना शिवा पवार ( म्हसळा ), प्रभा रामा चि पोळकर( मेंदडी), गुलाब चंद्रकांत जाधव ( म्हसळा), दिपाली दिपक मोहीते ( सरवर), शारदा सुनिल मौले , (मांदाटणे ), प्रिती  गणेश पारावे (सोनघर), सरिता दशरथ काते ( सावर) अशा १२ लाभार्थीना चालू आर्थिक वर्षात अनुदान वाटप केल्याचे संजय गांधी योजना अव्वल कारकून विशाल भालेकर यानी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा