छाया - सरपंच राजेश्री कांबळे, उपसरपंच रमेश चिपोळकर, सदस्य निषा पाटिल, राजेश्री पाटील, ज्योती पाटिल, महादेव धुमाळ, लक्ष्मी पायकोळी, दिलशाद नजीरी यांचा सत्कार करताना राष्ट्रवादीचे युवा नेते जमिर नजीर.
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेंदडी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवल्यानंतर शुक्रवार दि. ८ फेबृ. रोजी आपले सरपंच विराजमान केले. एकहाती राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आल्याने गावाच्या विकासाला वेगवान चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे युवा नेते व उद्योजक जमिर नजीर यांनी नवनिर्वाचित सरपंचाच्या सत्कार प्रसंगी काढले.
तालुक्यात २६ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये आंबेत वगळता सर्वत्र राष्ट्रवादी पक्षने आपले उमेदवार विजयी केले होते. विजयी ग्रामपंचायतीमध्ये सभापती छाया म्हात्रे यांच्या गणातील महत्वाची मेंदडी ग्रामपंचायत राष्ट्रवादीला पुन्हा मिळवून देण्यासाठी जमिर नजीर यांचे महत्वाचे योगदन आहे. एकहाती सत्तेमुळे गावाचा विकास वेगवान होणार असून सुनिल तटकरे यांच्या माध्यमातून गावात विकास होत असतानाच हा ट्रेलर आहे.
भविष्यात रोहीणी ग्रामपंचायत बिनविरोध व एकहाती राष्ट्रवादी काँग्रेसची, तर खारगांव ( बु) खामगांव व गोंडघर या ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस - शेका अधाडी कडेच असणार , रायगड लोकसभा व श्रीवर्धन विधानसभा आमचाच पक्ष जिंकणार असल्याची ग्वाही युवा नेते जमीर नजीर यानी दिली.
मेंदडी ग्रामपंचायती मध्ये विराजमान झालेले सरपंच राजेश्री कांबळे, उपसरपंच रमेश चिपोळकर, सदस्य निषा पाटील, राजेश्री पाटील, ज्योती पाटील, महादेव धुमाळ, लक्ष्मी पायकोळी, दिलशाद नजीरी यांचा सत्कार जमिर नजीर यांनी केला

Post a Comment