मायबोली मराठी चा जाज्वल्य अभिमान असावा ..संजीव डेगवेकर
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
आधुनिक काळात इंग्रजी भाषेचे प्रस्थ वाढले आहे .त्या कारणे कळत नकळत माय बोली मराठी ला दुय्यम स्थान दिले जाते ही वास्तविकता आहे .आपणांस मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान असावा जेणेकरून स्पर्धेच्या युगात आपण धीरोदात्तपणे मराठीचा झेंडा अभिमानाने फडकू शकतो .असे प्रतिपादन संजीव डेगवेकर यांनी केले .श्रीवर्धन एस टी महामंडळाच्या वतीने आयोजित मराठी भाषा दिवस निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते .आपल्या मातृभाषेचे अस्तित्व धोक्यात आले आहे त्यामुळे आपण सर्वांनी सजग असणे गरजेचे आहे .इंग्रजी जागतिक भाषा आहे यांची सर्वांना जाणीव आहे परंतु त्या कारणे आपल्या मराठी भाषेवर अन्याय करणे योग्य ठरणार नाही. आपल्या भाषेत विपुल साहित्य उपलब्ध आहे .प्र .के .अत्रे, कुसुमाग्रज, राम गणेश गडकरी अशा विविध लेखकांनी मराठी साहित्य समृद्ध केले आहे. सावकार ,पु. ल. देशपांडे, वी .पु .काळे ,साने गुरुजी यांनी साहित्याच्या माध्यमातून जनतेस जागृत व स्वाभिमानी बनवले .तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांनी वेद उपनिषदातील ज्ञान मराठी भाषेत सर्वसामान्य व्यक्ती साठी उपलब्ध करून दिले .मराठी ही जागतिक पातळीवर मान्यता मिळवणारी प्रगल्भ भाषा आहे. आपल्या सर्व शाळा व विद्यलयात मराठी भाषेची सक्ती साठी नवीन कायद्याची आवश्यकता आहे .तरुण पिढी ने मराठी भाषेतील समृद्ध वाड्मया चा हिरीरीने आस्वाद घेणे गरजेचे आहे. वाचनाने मन प्रसन्न बनते .वाचनालय चळवळीना सक्षम बनवले पाहिजे असे संजीव डेगवेकर यांनी सांगितले ."मराठी भाषा "या विषयी मकसूद नजिरी ,राहुल गायकवाड ,गोकुळ तांबे यांनी मनोगत व्यक्त केले .कार्यक्रम प्रसंगी स्थानक प्रमुख शर्वरी लांजेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व प्रवाशी जनतेचे आभार मानले व दर्जेदार सेवे साठी एस टी कटिबद्ध असल्याचे सांगितले . कार्यक्रमाची सुरुवात शालेय विद्यार्थीनी कुमारी मानसी कांबळे हिच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले . सदर कार्यक्रमासाठी भरत राठोड , शहाजी औटी ,अशोक शिंदे ,विलास श्रीवर्धनकर ,नारायण पवार व मोठया संख्येने एस टी प्रवाशी हजर होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद मोरे यांनी केले .


Post a Comment