श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन केंद्रात एचएससीच्या परीक्षा शांततेत सुरू असून श्रीवर्धन येथील गोखले कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात परीक्षा केंद्र असून या वर्षी ९९२ विद्यार्थी परीक्षा देत आहेत . परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त व्हावी , यासाठी गोखले कॉलेजचे प्राचार्य डॉ . एस . व्ही . जोशी , उपप्राचार्य प्रा . एस . आर . भोसले , केंद्रसंचालक प्रा . आर . पी . मुंढे , उपकेंद्र संचालक प्रा . नवज्योत जावळेकर , र . ना . राऊत हायस्कूल , उपकेंद्र संचालक प्रा . एस . जी . यादव , अंजुमन हायस्कूल उपकेंद्र संचालक प्रा . ए . बी . खरात यांनी विशेष खबरदारी घेतली आहे . गोखले कॉलेज हे तालुक्यातील एकमेव केंद्र असून विद्यार्थीसंख्या जास्त असल्याने बैठक व्यवस्था र . ना . राऊत महाविद्यालय , अंजुमन हायस्कूलमध्ये करण्यात आली आहे . परीक्षा सुरू असताना पो . नि . शिरोळे , गटशिक्षण अधिकारी नुर महमद राऊत , प्राचार्य डॉ . एस . व्ही जोशी , उपप्राचार्य एस . आर . भोसले यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या .

Post a Comment