छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही चे आद्य निर्माते ..प्रीतम श्रीवर्धनकर (नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते श्रीवर्धन नगरपालिका )
श्रीवर्धन प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे राजे होते .रयतेस ते आपल्या मुलाप्रमाणे जीव लावत युद्ध काळात सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची ते काळजी घेत त्या कारणे त्याना रयतेचा राजा संबोधले जाते .जगात खऱ्या अर्थाने लोकशाही ची स्थापना छत्रपती शिवरायांनी केली असे प्रतिपादन प्रीतम श्रीवर्धनकर यांनी केले. श्रीवर्धन एस टी आगारात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी श्रीवर्धनकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले शिवरायांचे कार्य कर्तृत्व आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे .मुघलशाही ,आदिलशाही ,निजामशाही यांनी भारतीय जनतेवर मोठया प्रमाणात अन्याय अत्याचार केला .हा अन्याय अत्याचार अनेक वर्षे चालू होता त्याला नष्ट करण्याचे काम शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून केले .स्वराज्य हे सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारे होते .शिवाजी राजे हे युगप्रवर्तक राजे होते .त्यांच्या मुळे जनतेस न्याय मिळाला .असे प्रीतम श्रीवर्धनकर यांनी सांगितले. सदरच्या कार्यक्रमात किरण अडखळे ,राहुल गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले .शिवराय व संत रोहिदास यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली सदर जयंती प्रसंगी श्री संत रोहिदास न्यास मंडळ श्रीवर्धन चे सर्व सभासद,एस टी आगाराचे उदय हाटे, भरत राठोड, विलास श्रीवर्धनकर व मोठया प्रमाणावर एस टी कर्मचारी हजर होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद मोरे यांनी केले .

Post a Comment