ग्रंथालयांची ताकद अफाट आहे : ग्रंथपाल क्रांतीकारकाची करू शकतील भूमिका : श्याम जोशी



( म्हसळा प्रतिनिधी )

ग्रंथालयांची क्षमता , ताकद अफाट आहे , त्यातील ग्रंथ साठा म्हणजे "हायली एक्सोझीव्ह" असतो . याचा योग्य तऱ्हेने वापर करून ग्रंथपाल समाजात क्रांतीकारक घडवू शकतात असे ग्रंथालये व ग्रंथपालांबाबत गौरउद्गार म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयामध्ये  झालेल्या 53 व्या जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशनात उद्घाटक म्हणून बोलताना ग्रंथ सखा बदलापूरचे अध्यक्ष शामसुंदर उर्फ श्याम जोशी यानी व्यक्त केले. यावेळी जेष्ठ साहित्यिक रवींद्र गुर्जर, रामभाऊ. म्हाळगी प्रबोधिनीचे ग्रंथपाल दिलीप नवेले, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष नागेश कुळकर्णी, म्हसळा तालुका सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे,मुंबई विभाग सहाय्यक ग्रंथालय संचालक श्रीमती शालिनी  इंगोले  जिल्हा ग्रंथालय अधिकारी, ध. बा वळवी , निरीक्षक अजित पवार,राजेश खेडेकर, संजय भायदे, संदीप नागे, मनोज गोगटे, प्रकाश पाटील, संजय जाधव आदी कार्यकारणी सदस्य व मान्यवर उपस्थित होते.
     ग्रंथालये व ग्रंथपाल कसा असावा, त्यांची कर्तव्य व जबादाऱ्या काय असतात यावर  श्याम जोशी यानी विशेष भर देत अतिशय सुंदर , परखड मते मांडली. ग्रंथपालानी चौफेर लेखनाला व साहित्यिकांना दाद दिली पाहीजे. ग्रंथपालानी वाचकांची नस ओळखून देशांतील नागरिक सर्वांगाने विकसीत करणे गरजेचे आहे. ग्रंथालय म्हणजे देशातील सुजाण नागरिक घडविण्याची कर्मभूमी आहे असे समाजमनांत वातावरण करणे आवश्यक आसल्याचे सांगितले. डिजीटल आक्रमणे वाढत असतानाच  ग्रंथपालाने समाजाचा " समुपदेशक" असा आपला ठसा मिर्माण करावा असे अनेक दाखले देत सांगितले. ग्रंथपालानी वाचकांचा आराखडा करणे आवश्यक आहे हे सांगतानाच तो कसा करावा याची माहिती दिली.यावेळी जेष्ठ साहित्यिक रवींद्र गुर्जर यानी आपल्याकडे असणारे साहीत्य संशोधन निष्ठ असावे त्याला दिर्घ काळ वाचकांची साथ मिळते असे सांगितले. रामभाऊ. म्हाळगी प्रबोधिनीचे ग्रंथपाल दिलीप नवेले यानी ग्रंथपालानी ग्रंथालयाची उत्पन्नाची साधने क्रिएटिव्हिटीने निर्माण करणे आवश्यक आहे असे सांगत ग्रंथपाल व कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले.  सार्वजनिक वाचनालय म्हसळा चे अध्यक्ष संजय खांबेटे यानी  अडचणींवर मात करीत वाचनालय कार्यकारणी, कर्मयचारी व हितचिंतकांच्या मदतीने परिपूर्ण  आसल्याचे सांगितले.


रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष नागेश कुळकर्णी यानी संघाचे महत्त्व व वाटचाल याबाबत सांगितले. सार्वजनिक वाचनालय म्हसळे  यांचे तर्फे उत्कृष्ट वाचक म्हणून प्रा.एम.ए. शेख यांचा मान्यवरांतर्फे सत्कार करण्यात आला. खुल्या अधिवेशनात Rrrlf च्या योजना, सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी संबंधित प्रश्न, अकार्यक्षम ग्रंथालये व त्यामुळे इतर ग्रंथालयांकडे  व चळवळीकडे  पाहण्याचा बदलणारा दृष्टिकोन यावर सकारात्मक चर्चा झाली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा