श्रीवर्धन मधील नागरिकां कडून पुलवामा हल्ल्याचा तीव्र निषेध : जनतेने पाकिस्तानी राष्ट्रध्वज जाळला



श्रीवर्धन प्रतिनिधी  :संतोष सापते

काश्मीर मधील पुलवामा येथील हल्ल्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत .श्रीवर्धन मधील शिवाजी चौकात शहरातील असंख्य देशीप्रेमी नागरिकांनी जाहीर निषेध सभेचे आयोजन केले. सर्व प्रथम शहरातून प्रभात फेरी चे आयोजित करण्यात आली त्या मध्ये लहान थोरांनी सदरच्या प्रभात फेरीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.  .भारत माता की जय ,वंदे मातरम ,छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा राष्ट्रप्रेमी घोषणानी सर्व परिसर निनादला .तिरंगा ध्वज हातात घेऊन तरुणांनी आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खान चा पुतळा जाळला .श्रीवर्धन तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सर्व सामान्य नागरिक व मोठया प्रमाणात महिलांनी सदरच्या निषेध सभेत उपस्थिती दर्शवली आहे.
काझी हुसेन महिमकर यांनी आपल्या मनोगतात  भारत हा सर्व धर्मीय  लोकांचा देश आहे .गुरुवारी  जवानांवर झालेला हल्ला हा भारतीय लोकशाही वर झालेला हल्ला आहे .आम्ही त्याचा निषेध करतो .अशा हल्ल्याला उत्तर देण्याची वेळ आता आली आहे आपण सरकार कडे पाकिस्तान वर हल्ला करण्याची मागणी करूया . शहिदांच्या घरच्या व्यक्तीच्या दुःखात आपण सर्व सामील आहोत .असे प्रतिपादन केले .शाबीस्ता सरखोत व खलिफे  यांनी तीव्र शब्दात हल्ल्याचा धिक्कार केला .तसेच शहीद जवानांना  भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली .प्रतोष कोलथरकर यांनी उपस्थित सर्व समुदायाचे आभार मानले .व सरकारने सदर हल्ल्याला तात्काळ उत्तर द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली .आदेश पाटील यांनी आपल्या मनोगतात नागरिकांनी उत्स्फूर्त पणे बंद पाळला त्या बद्दल सर्वांचे आभार मानले व शहीद जवानांच्या प्रती सार्थ अभिमान व्यक्त केला .श्रीवर्धन चे माजी आमदार सुनील तटकरे यांनी आपल्या मनोगतात  शोकाकुल श्रीवर्धन च्या जनतेचे सांत्वन केले व पाकिस्तान ने केलेला हल्ला हा  भ्याड स्वरूपाचा आहे .हा हल्ला म्हणजे पाठीमागून खंजीर खुपसला आहे .शत्रू राष्ट्रात समोरासमोर लढण्याचे धारिष्ट नाही त्यामुळे ते छुप्या पद्धतीने भ्याड हल्ले करत आहेत .परंतु भारत अशा हल्ला ना चोख प्रत्युत्तर दिल्या शिवाय राहणार नाही असे तटकरे यांनी सांगितले. संजीव डेगवेकर यांनी आपल्या मनोगतात ऐतिहासिक घटना चा संदर्भ देत सद्य स्थितीतील पाकिस्तानातील वास्तविकता विशद केली . आपल्या  देशाचे नेतृत्व शक्तिशाली आहे त्यामुळे पाकिस्तान ला चोख प्रतिउत्तर दिले जाणार असे डेगवेकर यांनी सांगितले .कार्यक्रम आयोजनात अमर गुरव ,संतोष वेशविकर, संजय रिकामे, संतोष चौकर, सुनील दर्गे ,समीर पाटील, राजेश लोहार ,मकसूद नजिरी ,जुनेद दुस्ते  , प्रीतम श्रीवर्धनकर, अमर पवार ,जितेंद्र करंजकर ,नवनीत तोडणकर या राष्ट्रवादी प्रेमी नागरिकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा