टीम म्हसळा लाईव्ह
देशभरात सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. निवडणुकांसादर्भात अनेक पोल्स आता समोर येऊ लागलेत. म्हसळा live ने जाणून घेतलीय रायगड च्या तरुणांची पसंती. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या तरुणांकडून म्हसळा Live ने जाणून घेतले त्यांचं मत. रायगड लोकसभेसाठी आपली पसंती कोणाला हे फेसबुक च्या माध्यमातून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ६१०० लोकांनी आपल्या पसंतीच्या लोकप्रतिनिधी ला निवडलं आहे. ही लोकसभा मोठ्या चुरशीची होईल असच आमच्या या पोल वरून दिसून येतं. यापोल ला पंधरा दिवस झाल्यानंतर आम्ही तो तुमच्यासमोर ठेवला होत्या त्यावेळी दोघांनाही समसमान १४०० प्रत्येकी मत पडली होती. दिवसागणिक चित्र बदलत होत. कधी केंद्रीय मंत्री अनंत गीते पुढे होते तर कधी राष्ट्रवादीचे तटकरे. आज प्रत्यक्ष पोल संपल्यानंतर ६१०० पैकी ३००० मत केंद्रीय मंत्री गीते यांना तर ३१०० मते सुनील तटकरे यांना पडली आहेत.
हा पोल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता आतापर्यंत तो एक लाखाहून अधिक लोकांपर्यंत पोहोचला आहे. तर ३५००० हुन अधिक लोक या प्रक्रियेत सहभागी झाले होते. यामध्ये १८०० हुन अधिक लाईक्स आणि १८०० हुन अधिक प्रतिक्रियांचा समावेश आहे. ही लोकसभा मोठया चुरशीची होणार हे मात्र नक्की. आता प्रत्यक्षात रायगड मध्ये कोण बाजी मारत हे पाहणं औत्सुक्याचे आहे. आपला मतदार राजा सुज्ञ आहे. या लोकसभेत मतदार तटकरेंना संधी देतात का की पुन्हा अनंत गीतेंच्या गळ्यात विजयश्री टाकतात हे वेळच ठरवेल..

Post a Comment