श्रीवर्धन आगरी समाज भवनाच्या उदघाटनप्रसंगी सेना, राष्ट्रवादीची श्रेयवादाची लढाई
उद्घाटक अनंत गिते व प्रमुख अतिथी सुनील तटकरे या दोघानीही आगरी समाजाला दिले भरघोस निधीचे अश्वासन
(म्हसळा -प्रतिनिधी)
म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथे उभारण्यात आलेला 18 गाव म्हसळा श्रीवर्धन आगरी भवनाच्या उदघाटनप्रसंगी श्रेयवादाची लढाई पहावयास मिळाली.माजी मंत्री सुनील तटकरे यांनी सर्वात जास्त निधी देऊनही आमचे नाव पाटीवर तीन नंबरवर लावल्याचे निदर्शनास आणुन देत त्यांनी या वेळी आयोजका समज दिली तर आगरी समाज संकुलासाठी सर्वात जास्त निधी शिवसेनेने दिला आहे असे केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी ठामपणे सांगितले.म्हसळा श्रीवर्धन आगरी समाज संघटनेच्या मौजे मेंदडी येथे बांधण्यात आलेल्या आगरी समाज भवनाचा लोकार्पण सोहळा मेंदडी येथे संपन्न झाला.आगरी समाज भवनाचे उदघाटन रायगडचे खासदार अनंत गीते यांचे हस्ते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी मंत्री सुनिल तटकरे प्रथम उपस्थित होते.
या वेळी तटकरे यांनी माझे आगरी समाजावर प्रेम भरपूर आहे त्यामुळे सर्वात पहिले व सर्वात जास्त 37 लक्ष रुपयांचा निधी मी दिला असल्याचा मला अभिमान आहे.आगरी समाजानी जेव्हा जेव्हा मागणी केली त्या वेळेस त्यांना निधी देण्यात आला. या पुढेही आगरी समाजाच्या भवनासाठी अनिकेत तटकरे यांच्या आमदार निधीतून 15 लाख देण्याची घोषणा त्यांनी केली. आगरी समाजाची उभी असलेली हि भव्य इमारत आज माज़ी सभापती महादेव पाटील यांच्या प्रयत्नामुळे उभी आहे.महादेव पाटील यांनी या इमारती साठी केलेली धावपळ हि जग जाहीर असून त्यांनी आणखी निधी मागितल्यास मी जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांच्या मार्फत देण्याचा प्रयत्न करीन.कार्यक्रमाप्रसंगी सुनील तटकरे यांनी अठरा गाव आगरी समाज अध्यक्ष महादेव पाटील यांच्यावर स्तुती सुमने उधळताना मतांपेक्षा विकास आणि सेवा हाच माझ्या विकासाचा केंद्र बिंदू असल्याचे प्रतिपादन करित आगरी समाज भवन सभागृहात हजारोंच्या संख्येने उपस्थित बंधुभगिनींना त्यांच्या प्रभावी अभ्यासू वकृत्वाने मंत्रमुग्ध केले.याप्रसंगी राष्ट्रवादीचे श्रीवर्धन तालुक्याचे नेते महमद मेमन,सभापती छाया म्हात्रे,तालुका अध्यक्ष समीर बनकर यांचासाहित अनेक मान्यवर उपस्थित होते.
"आगामी लोकसभा निवडणुकीतील परस्परविरोधी उमेदवारांची एकाच व्यासपीठावर येण्याची वेळ चुकल्याने उपस्थितांना त्यांची शाब्दिक जुगलबंदी ऐकायला मिळाली नाही ?
माजी मंत्री सुनिल तटकरे यांचे मार्गदर्शन संपल्यावर ते पूर्व नियोजीत कार्यक्रमाला निघुन गेल्या नंतर लागलीच केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांचे आगमन झाले त्यांचे हस्ते 18 गाव आगरी भवनाचे उदघाटन करण्यात आले त्यांनीही आपल्या भाषणात शिवसेनेने या भवनासाठी सर्वात जास्त निधी दिल्याची बाब उपस्थितांच्या निदर्शनात आणली.या भवनाच्या पूर्णत्वाला 15 लक्ष रुपये निधी दिल्याने हे काम पूर्ण झाले याचा मला अभिमान असल्याचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी सांगितले.आगरी समाज हा सुद्धा इतर समाजा प्रमाणे श्रेष्ठ समाज असून समाजाचे विकासासाठी आणखीन निधी देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.यावेळी व्यास पीठावर माणगाव येथील शिवसेना नेते राजीव साबळे, श्रीवर्धन मतदारसंघ संपर्क प्रमुख सुजित तांदलेकर, श्रीवर्धन सभापती मीना गाणेकर,तालुका प्रमुख नंदू शिर्के,प्रतोष कोलथरकर यांच्या सहित आगरी समाजाचे संपूर्ण पदाधिकारी आणि समाज बांधव उपस्थित होते. या उदघाटन प्रसंगी सुनील तटकरे आणी अनंत गीते हे एकाच व्यासपीठावर येतील अशी सर्वाना आशा होती यामुळे संपूर्ण मतदार संघाचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले होते परंतु तसे न होता वेळेचे ताळमेळ न झाल्याने प्रथम माजी मंत्री सुनील तटकरे उपस्थित राहिले आणी ते गेल्यानंतर केंद्रीय मंत्री अनंत गीते उपस्थित राहिले.
समाज अध्यक्ष महादेव पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले व समाज कार्याची आपली तळमळ मान्यवरांच्या आणि उपस्थित समाजा समोर ठेवत आपले कार्य करत राहु असे सांगितले.कार्यक्रमाचे नीटनेटके सूत्रसंचालन वारळकर गुरुजी यांनी केले.
"उद्घाटक अनंत गिते व प्रमुख अतिथी सुनील तटकरे या दोघानीही आपापली कामे केली. आयोजकानी त्याना एकाच वेळेचे आमंत्रण दिले होते. त्यांच्या वेळा चुकल्या पण महादेवरावानी समाजासाठी अचूक वेळ साधल्याने हाजारो आगरी बांधवांना पुढील भरघोस निधीसाठी .अश्वासीत केले. तिथे पण तटकरे ठरले भारी अशी उपस्थित राजकीय कार्यकर्त्यां च्यात चर्चा होती"



Post a Comment