एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंर्तगत राबविण्यात येणारे उपक्रम चांगले असतात. : बबन मनवे
संजय खाबेटे : म्हसळा
शासननिर्णया नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंर्तगत आरोग्य व कायदे विषयक शिबीरा आज म्हसळा येथे संपन्न झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य बबन मनवे यानी एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंर्तगत राबविण्यात येणारे उपक्रम चांगले असतात ते समाजात पोहचविण्याचे काम तुमच्या हातून होत असते .प्रत्येक महिला सक्षम व कार्यक्षम असणे गरजेचे आहे त्यासाठी आज होणाऱ्या आरोग्य व कायदेविषयक प्रशिक्षण कार्यक्रमास त्यानी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले, जिल्हा परिषद सदस्य बबन मनवे, पंचायत समिती सदस्य मधुकर गायकर , माजी सभापती उत्वला सावंत ,गट शिक्षणअधिकारी संतोष शेडगे, प्रकल्य अधिकारी तरवडे , गट विकास अधिकारी वाय.एन प्रभे, प्रकाश ऊर्फ बाबा करडे ,आरोग्य विभागाच्या डॉ. स्मिता पाटील , सर्व बीट अधिकारी तालुक्यातील अंगणवाडी सेवीका ,मदतनीस, आशा कर्मचारी मोठया संख्येने उपस्थितीत होत्या .
या वेळी रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या त्यातील बहुतांश
स्पर्धकानी मुलगा असो का मुलगी, तसेच बेटी बचाव बेटी पढाव , पर्यावरण अशा बाबत शासन निर्णय समाज मनात रुजणे बाबत रांगोळी काढली होती प्रथम क्रमांक , तोंडसुरे अंगणवाडी, दुसरा क्रमांक सकलप ,तिसरा क्रमांक चाफेवाढी, चौथा क्रमांक नेवरूळ येथील अंगणवाडीचा आला. यांना भेटवस्तू देऊन गौरवीण्यात आले.केंद्र आजच्या प्रक्षिणासाठी आरोग्य विषयक सल्ला देण्यासाठी आरोग्य कर्मचारी पाटील मॅडम यांनी माहीती सांगितले. यावेळी कुपोषण आणि महिला आरोग्य ह्याना डॉ . स्मिता पाटील, कायदेविषयक मार्गदर्शन अॅड मुकेश पाटील यांनी केले.आपणाला कोणते अधिकार दिले आहेत . त्याचा कशा प्रकारे वापर करावा . वेळप्रसगी आपण न घाबरता कायदा काय हे पाहुन त्याला सामोरे जाणे गरजेचे आहे. ह्या विषयी सखोल मार्गदर्शन केला . त्याच बरोबर कायदयाचा अभ्यास व त्याचा फायदा कशाप्रकारे करायचा हे पाटील यानी सांगितले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेणुका पाटील यांनी केले .
" या वेळी गटविकास अधिकारी वाय.एन. प्रभे यानी आपले मनोगत मांडताना एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंर्तगत विविध विषयांत काम करताना बाल विवाह टाळणे . म्हसळा तालुका व जिल्हा हागणदारी मुक्त असताना व्यैयक्तीक शौचालयांचा वापर जास्तीत जास्त करणे, पर्यावरण मुक्त गाव, वाडी, ग्रामपंचायत घडविणे याबाबत विषय हाताळणी करणे आवश्यक आसताना राज्यांतील पालघर जिल्ह्यात कुघोषण प्रमाण जास्त आहे, मराठवाडयांत अद्यापही उघडयावर शौचास बसण्याचे प्रमाण जास्त आसल्याची माहीती ऊस्थिताना दिली"

Post a Comment