बुथ पातळीवरील सर्व कार्यकर्त्यानी घराघरावर भाजपाचा झेंडा फडकवावा.
( म्हसळा प्रतिनिधी )
रायगड जिल्हयातील बहुतांश नागरिक रोजीरोटी साठी स्थलांतर हाच मुख्य मार्ग पत्करत असतात त्या एवजी गावांतच रहा ! गावाकडे चला!! ही संकल्पना आपण आपल्या गाव- वाडींतून राबविणे आवश्यक आहे. आपणाकडे आसणाऱ्या कौशल्यातून छोटे छोटे व्यवसाय अगर उद्योगाने सुरवात करावी. केंद्र व राज्य शासनाने फार मोठया प्रमाणात सोयी -सुविधा केल्या असल्याने कोकणात व दाक्षिण रायगड मध्ये मोठया प्रमाणांत छोटे- मोठे उद्योग येत आहेत. C. M. फेलोशिपच्या माध्यमातून राज्यांतील गावे दत्तक घेतली असून त्या गावातील महिलांना एलईडी बल्ब , ज्वेलरी अन्य व्यवसाय बनवण्याचे प्रशिक्षण दिले असल्याची माहिती चन्हाण यानी दिली . यावेळी श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष कृष्णा कोबनाक, वरिष्ठ नेते संजय कोनकर, तालुका अध्यक्ष शैलेषभाई पटेल उपस्थित होते.मागील सरकारच्या तुलनेत भाजप सरकारने रायगड जिल्हयाच्या विकासाला गती प्राप्त करून दिली आहे. जिल्हयातील रखडलेला राष्ट्रीय मार्ग पुर्णत्वात आला आहे,त्यातून वेगवेगळ्या संधी युवकाना उपलब्ध होणार असल्याचे चव्हाण यानी म्हसळा भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परीषदेंत सांगितले.राज्यातील 450 हून अधिक गड किल्ल्यांचे जतन संवर्धन करण्यासाठी शिवभक्त गड-दुर्गप्रमी प्रयत्नशिल असतात. त्यांच्या या प्रयत्नांना शासनाने मनरेगा अर्थात रोजगार हमी योजनेची घोषणा केली आहे, तर रायगड किल्यासाठी पुरातत्व विभागाच्या परवानगी सहीत ६५० कोटीची निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हयात पावसाचे सरासरी ३५०० मी मी .पेक्षा अधिक असतानाही शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईची झळ भासते. पंधरा वर्ष मंत्रीपद संभाळल्या नंतरही जिल्हयात पाणीटंचाई होते, जे विकासाच्या नावाने बोंब मारतात ते जनतेला साधे पाणीही पाजू शकत नाहीत. हे येथील जनतेचे दुर्भाग्य असल्याची टिका पालकमंत्री ना. चव्हाण यांनी माजी पालकमंत्री सुनिल तटकरेंचे नाव न घेता केली. म्हसळा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ना. चव्हाण यांनी शासनाच्या अनेक योजना मोजून दाखवल्या असून, पुढील निवडणूकीत जनताच भ्रष्टाचारी उमेदवाराना धडा शिकवा व पुन्हा भाजप सरकारला निवडून देईल असा विश्वास दाखवला. यावेळी गाव -वाडी वरील प्रत्येकाने आपल्या घरावर भाजपाचा झेंड फडकवावा व सेल्फी काढून सोशल मिडीयावर पोस्ट करा. राज्य व केंद्र शासनाने दिलेल्या प्रत्येक योजना घराघरांत पोहचल्या. त्याचप्रमाणे घरावर भाजपाचा झेंडा फडकवावा असे अवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यानी केले.

Post a Comment