म्हसळा (बाबू शिर्के)
रायगड लोकसभा मतदार संघातील जनता सुजाण आहे ते भ्रष्टाचाराला थारा देणार नाहीत.केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आपल्या खासदार निधीतून केलेल्या विकासकामाच्याजोरांवर जनता त्यांना पुन्हा खासदार करणार असा विश्वास श्रीवर्धन मतदार संपर्क प्रमुख सुजित तांदळेकर यांनी म्हसळा येथे शिवसेना कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत व्यक्त केला. आमच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे, सर्व शिवसैनिक मोठ्या जोमाने कामाला लागले आहेत.केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या दौऱ्याला मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी कितीही प्रयत्न केले तरी आगामी लोकसभा निवडणुकीत अनंत गीते मोठ्या मताधिक्याने विजयी होणार तसेच सुनील तटकरे यांचा मागील झालेल्या पराभवाप्रमाणे या निवडणुकीत पुन्हा मोठया मताधिक्याने पराभव होणार असून त्यांची राजकीय कारकीर्द संपणार असे ठामपणे या बैठकीत सांगितले.यावेळी माजी आमदार तुकाराम सुर्वे, तालुका प्रमुख नंदू शिर्के, युवासेना तालुका अधिकारी अमित महामुनकर, महिला आघाडी प्रमुख रीमा महामुनकर, निशा पाटील, उपतालुका प्रमुख भाई कांबळे, श्याम कांबळे, बाळा म्हात्रे, अक्रम साने उपस्थित होते.

Post a Comment