म्हसळा ग्रामपंचायत निवडणूक म्हसळा लाईव्हचे भाकीत १ नंबर
रोहीणी ग्रामपंचायत १०० % राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतली ताब्यात.
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यातील चार ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे रोहीणी, गोंडघर, खामगाव व खारगांव (बु.) अशा आहेत. अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी रोहीणी ग्रामपंचायती साठी थेट सरपंच १ पद व तीन प्रभागातून अन्य ७ सदस्यांचे साठी तेवढच अर्ज दाखल आसल्याने ही ग्रामपंचायत बीन वीरोध आल्यासारखे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसने आपले रोहीणीवर प्राबल्य राखले . गोंडघर, खामगाव व खारगांव (बु.) या 'अन्य तीन ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी तीरंगी लढतींची शक्यता आहे. या साठी ३ सरपंच पदासाठी १५ उमेदवार २५ सदस्य पदासाठी ५५ उमेदवार रिंगणात आहेत. खामगाव ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी ६ व ३ प्रभागांतून ९ सदस्यांसाठी २४ जण रिंगणात आहेत. गोडघर ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी ५ , ३ प्रभागांतून ९ सदस्यांसाठी १४ जण रिंगणात आहेत. प्रभाग ३मधून सचीन नवनाथ पयेर, वैशाली हरीदास सावंत व पुष्पा काशिनाथ नाईक यांना प्रातिस्पर्धी नसल्याने बिनविरोध आहेत.खारगांव (बु.)ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी ४ , ३ प्रभागांतून ७ जागांसाठी १५ जण रिंगणात आहेत.वॉर्ड क्रं .२ मध्ये दोनही जागेसाठी स्पर्धक नसल्याने सुरई येथील संतोष दाजी जाधव व सरिता शांताराम जाधव यांची बिनविरोध निवड आहे. रोहीणी ग्रामपंचायतीवर एकहाती राष्ट्रवादीची सत्ता आल्याने . उर्वरीत ग्रामपंचायती मध्ये राष्ट्रवादीची सरशी ठरेल . गोंडघर व खारगांव ( बु ) मध्ये थेट सरपंच लढत निकरीची होणार आहे.
उर्वरीत निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे ---
छाननी सोम. सोम ११ / २ / १९ (स .११ ), अर्ज मागे घेणे बुध. दि. १३ / २/१९ दुपारी ३ वा.पर्यत, चिन्ह वाटप त्याच दिवशी दु. ३ वाजे नंतर. मतदान रवीवार दिं .२४ फेब्रुवारी रोजी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायं ५.३० पर्यंत.

Post a Comment