हळदीकुंकू व विविध मनोरंजनातन्मक खेळातून महिलांनी पुन्हा एकदा अनुभवलं बालपण



राजिप शाळा चिरगाव येथे हळदीकुंकू व विविध मनोरंजनातन्मक खेळातून महिलांनी पुन्हा एकदा  अनुभवलं बालपण: तर विदर्यार्थाना खाऊ विक्रितून दिले शिक्षकांनी व्यवहार ज्ञान


म्हसळा (निकेश कोकचा )

रायगड जिल्हा परिषद शाळा चिरगाव,ता.म्हसळा येथे महिलांसाठी हळदीकुंकू व विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन शाळेतर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गावातील व पंचक्रोशीतील सुमारे दिडशे महिला व चिखलप केंद्रातील महिला शिक्षिका, कॉलेज युवती यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सर्वांनी मनोरंजनात्मक खेळांचा मनसोक्त आनंद लुटला. यावेळी  आयोजित विविध कार्यक्रमामध्ये विदर्याथ्याना खाऊ स्टॉलच्या माध्यमातून शाळेतील शिक्षकांनी व्यवहारज्ञानचे संपुर्ण शिक्षण दिले असल्याची माहिती शिक्षक विक्रम पवार यांनी दिली.


रायगड जिल्हा परिषद शाळा चिरगाव आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे शालेय परिसराला एखाद्या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची दुकाने थाटली होती. गावातील लोकांनी त्यांच्याकडून विविध वस्तूंची खरेदी केली. यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांनी हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने येणाऱ्या महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन केले होते,यामध्ये संगीत खुर्ची,चमचा लिंबू, बादलीत चेंडू टाकणे,बांगडीत नाणे टाकणे, मडके फोडणे,गाढवाला शेपूट लावणे,नशिबाची लॉटरी,मेणबत्ती पेटविणे आशा प्रकारचे खेळ आयोजित केले होते. तसेच भेळ व सरबतचे स्टॉल मांडून विद्यार्थ्यांनी तेथे प्रचंड गर्दी खेचत भेळ व सरबतची विक्री करून सुमारे तीन हजार रुपयाचा निधी जमा केला.
या कार्यक्रमासाठी म्हसळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संतोषजी शेडगे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून शाळेने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे खूप कौतुक केले,अशाप्रकारचे कार्यक्रम राबवून ग्रामस्थ आणि शाळा यांचे  संबंध कायम जुळून राहतात,लोकांना आपल्या शाळेत पुन्हा बालपण अनुभवण्याचा आनंद मिळतो व शाळेतून विद्यार्थ्यांना  केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता त्यांना व्यावहारिक ज्ञानाची माहिती सुद्धा अशापद्धतीने दिली जाते असे सांगितले.त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांचे व शिक्षकांचे खूप अभिनंदन व कौतुक केले. 
दिवसभराच्या नियोजित या कार्यक्रमात वृद्ध महिला व पुरुषसुद्धा  मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्यांनीसुद्धा अनेक खेळात सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे,प्रकाश मांडवकर,महिला शिक्षिका अश्विनी शिंदे,मेघा गुडे,ग्रा.पं. सदस्या बारे ताई,माजी सरपंच विणाली मोरे,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रिद्धीताई आगरी,उपसरपंच मोहन शिंदे,गोपाळ शिंदे,शांताराम शिंदे,शांताराम आगरी व गावातील ज्येष्ठ नागरिक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक विलास सुटे सर, विक्रम पवार सर, अमित महागावकर सर, मच्छीन्द्र खेमनर सर,बागेची वाडीचे कपिल टोने सर यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे राबविला. त्याबद्दल ग्रामस्थांकडून शिक्षकांचेही धन्यवाद मानले.


फोटो -उपस्थित ग्रामस्थ व  विदर्यार्थाना पुढील काळात व्यवहाराच्या ज्ञान प्राप्तीसाठी मार्गदर्शन करताना गट शिक्षणअधिकारी संतोष शेडगे मार्गदर्शन करताना. ( छाया_ निकेश कोकचा )

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा