अठरा वर्षात बहुजन समाजाची सेवा करत तालुक्यात अनेक कुटुंबाना दिला लत
संजय खांबेटे : म्हसळा
महाराष्ट्रात व विशेषतः कोकणांत सर्वच ठिकाणी कुणबी समाज हा अग्रस्थानी आहे .त्याचेच प्रतिक म्हसळा तालुक्यात कुणबी समाजाने तब्बल १९ वर्षा पूर्वी कुणबी ग्रामीण सहकारी पतसंस्था स्थापन करून समाजाला आर्थिक बळ देण्याचे काम केले. पतसंस्था आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेत उभी राहत असल्याचा मला मनस्वी आनंद होत असून ह्याच्या मध्ये माझ्या संपूर्ण कुणबी समाज ,बहुजन समाज , व्यापारी ,हितचिंतक , अधिकारी , कर्मचारी संचालक यांचा मोठा सहभाग आहे अशा शब्दात वास्तुचे उद्दघाट्न करताना कृष्णा कोबनाक यानी सांगितले, यावेळी संस्थेचे पतसंस्था चेअरमन तथा न्यायदान कमिटी अध्यक्ष लक्ष्मण भाये, कुणबी समाज नेते अमोलजी मोरे, महेंद्र टिंगरे , सुनिल मोरे यांच्या प्रमुख उपस्थिती व , तालुका अध्यक्ष महादेव भिकाजी पाटील , तालुका चिटणीस रामचंद्र बोर्ले उपाध्यक्ष दिलीप मांडवकर , ,संचालक कुणंबी समाज जेष्ठ नेते श्रीपद धोकटे ,विभाग अध्यक्ष तथा तालुका चिटनिस गणेश बोर्ले ,विभाग अध्यक्ष गजानन गिजे , ,दिलीप मांडवकर आणि दगडू डांगे , व्यवस्थापक महेंद्र धामणे , लिपिक संजय गुलगुले , अनंत अंबावले , सुनिल घङशी , कीशोरी उंडे , संस्थेचे सर्व संचालक तालुक्यातील सर्व समाज बांधव सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते . संस्थेचा विकास हा झपाट्यानी वाढत आहे अगदी सुरूवाती पासून लहान ठेवी पासून ते कोटीच्या ठेवी स्विकारुन आज गेल्या स्थापनेपासून आर्थिक ठेवीचा उचांग गाटला आहे ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे समाजात व संस्थेत एक संघता आहे .आज सहकारी क्षेत्रात संस्थेने तालुक्यात आपली कामगिरी दमदार केली आहे .शहरातील व्यापारी आणि संस्था ह्यांचे नाते अगदी स्नेहाचे आहेत एका विशीष्ट समाजाची संस्था असली तरी बहुजन समाजाची मदत ह्या संस्थेला चांगली होत आसल्याचे सांगण्यात आले. आजवर संस्थेचा आर्थिक कारभार 5 कोटीचा असून सभासद संख्या 2800 आहे .अनेक सभासदाना व्यवसाय , उद्योग ,घर अन्य अडचणी साठी आर्थिक साह्य केल्याने आज त्यांची प्रगती झाली आहे .
"संस्थेचा नविन वास्तुमध्ये प्रवेश म्हणजे प्रगतीची अचूक वाटचाल. या संस्थेला सभापती कुणबी समाज नेते कै.एस.डि.शिंदे साहेब यांचे सक्रीय सहकार्य व आजचा नवीन वास्तू प्रवेशाचे माझे हस्ते उद्घाटन ही मी माझे भाग्य समजतो समाजाने माझ्यावर टाकलेला भार मी तेवढयाच सकारात्मक तेने सांभाळीन"
कृष्णा कोबनाक.सामाजिक नेते

Post a Comment