म्हसळ्यात चार दुकानांना भीषण आग तीन लाखाचे नुकसान


संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळा शहरातील मुख्य बाजारपेठेतील नगरपंचायत कार्यालया समोर असणाऱ्या चार दुकानांना आज पहाटे पाचच्या सुमारास आग लागली आगीत नौशाद इस्माइल कुंतन तैरबील याची पानटपरी व अन्य तीन छोटी दुकाने आगीचे भक्ष्य ठरले . यामध्ये नौशाद चे पान, विडी, सीगारेटचे सुमारे २.४० लक्ष व अन्य तीघांचे ७० -८० हजाराचे नुकसान झाल्याचे पोलीस सूत्रानी सांगीतले. शार्ट सर्कीट मुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तविण्यात आली. अन्य नुकसानीत नंदकुमार ढवळे यांचे टेलरचे दुकान, ओमकार करंबे यांचे तंबाखूचे व फणसे यांचे चपलेचे दुकान आगीचे भक्ष्य ठरले .आगीचे वृत्त कळताच   नगरसेवक करण गायकवाड आणी आसपासच्या नागरिकांनी  ताबडतोब घटना स्थळी पोहचून मिळेल त्या साधनानी मदतकार्य सुरु केले. त्याच वेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यानी श्रीवर्धन नगरपालीकेचा पाण्याचा बंब पाचारण केल्याने आग आटोक्यात आणण्यास मदत झाली. घटनेचे वृत्त कळताच 
 श्रीवर्धन प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार रामदास झळके यानी घटनास्थळी भेट दिली.आग आटोक्यात आणण्यात यश आले नसते तर परीसरांत दाटीने असणाऱ्या मिरची गल्लीतील दुकाने आगीचे' भक्ष्य ठरले असते.


म्हसळा बाजारपेठेंत नबाब कालीन काळापासून ५-६ सार्वजनीक विहीरी आहेत. अगीसारख्या अपत कालीन परिस्थीतीत त्यांचा वापर व्हावा ह्याच मुख्य उद्देशाने त्या १०० ते ११० वर्षापूर्वी बांधलेल्या होत्या त्यांचा नगर पंचायतीने वापर करणे आवश्यक आहे .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा