खामगांव पंचक्रोशी अॅग्रो दक्षीण रायगड मधील महत्त्वाचा कृषी प्रकल्प ठरणार.


 230 शेतकऱ्यांनी मिळून केली उत्पादक कंपनीची स्थापना 

संजय खांबेटे : म्हसळा 

       महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या "गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतीस चालना "या योजने अंतर्गत स्थापन केलेल्या खामगांव पंचक्रोशी अॅग्रो फार्मस प्रोड्युसर कंपनी लिमिटेड चा उद्धाटन सोहळा श्री.पांडुरंग शेळके  जिल्हा अधिक्षक - कृषी अधिकारी रायगड यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला .यावेळी शेळके यानी खामगांव पंचक्रोशी अॅग्रो दक्षीण रायगाड मधील महत्त्वाचा कृषी प्रकल्प ठरणार आहे त्यांच्या समवेत कृषी विभागाचे नाव उंचावणार असल्याचे सांगितले. कंपनीचे संस्थापक बाळकृष्ण सावंत यांच्या अध्यक्षतेखाली खामगांव येथिल मराठा भवन च्या सभागृहात झालेल्या  या कार्यक्रमात 
उपविभागीय कृषी अधिकारी विष्णूसाळवे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी भांडवलकर,नंदू शिर्के, जि.प. च्या माजी सदस्या श्रीमती वैशाली सावंत, प्रगतीशील शेतकरी व्यंकटेश सावंत,संचालक श्री . विठोबा गोसावी , श्री .रामदास खामगांवकर , श्री .अनंत पारावे, श्री . नरेश पारावे तसेच श्री . नारायण मालप, सखाराम पवार , सुरेश तांबे,रोशन पारावे,  प्रभाकर बोले, कृषी सहाय्यक श्री . शिवाजी राठोड व पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते .
       कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली 230 शेतकऱ्यानी एकत्रीत येवून ही संस्था स्थापन केली आहे.असून 104 एकर जमीनीमध्ये शेती तथा शेती पुरक विविध उपक्रम राबविणे प्रस्तावित आहे . रु 187.34 लक्ष चाप्रकल्प आराखडा शासनाला सादर केला असून  मंजूरी प्राप्त आहे . या मध्ये सिंचन सुविधा , सामुहिक शेती,( केळी ,भाजीपाला ,स्ट्रॉबेरी  , बटाटा  ,कणगर लागवड ,फुलशेती , हरितगृह , कृषी अवजारांची बँक , सामुहिक तळे, दुग्ध व्यवसाय व शेळी पालन शेड , कुक्कुटपालन जाळी , फळ भाजी साठवण केंद्र, पॅक हाऊस , काजू प्रक्रीया केंद्र , डाळ प्रक्रिया केंद्र आठवडी बाजार , दुध संकलन केंद्र, प्रशिक्षण व  प्रसीध्दी इत्यादी घटकांचा समावेश आहे .सदर घटकांच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या गट शेती योजनेतून रू .95 79 लक्ष तथा प्रचलित योजनांतून रु 20 लक्ष अनुदान प्रकल्प आराखड्यातील घटकांच्या अंमलबजावणी नंतर कंपनीला मिळणार आहेत .

       " खामगांव पंचक्रोशी अॅग्रो राबविताना भविष्यात गट शेती करणाऱ्यांची संख्या वाढली पाहीजे विविध शेती उत्पादन करताना राज्य व केंद्र शासनाचा गावा कडे चला हा संदेश प्रथम पंचक्रोशी -तालुका -जिल्ह्या पर्यंत पोहचला पाहीजे , संस्थेने भविष्यात सहकारी चळवळीकडे वाटचाल करावी "
विष्णूसाळवे, उपविभागीय कृषी अधिकारी, महाड
फोटो

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा