प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
रांगोळ्यांच गाव अशी वेगळी ओळख महाराष्ट्रातील जूचंद्र या गावाने जगभरात मिळवली आणि जूचंद्र च्या रांगोळी कलाकारांना जगाने डोक्यावर घेतल. जगभरातुन त्यांना रांगोळ्या काढण्यासाठी आमंत्रित केलं जाऊ लागलं. आज जूचंद्राच्या रांगोळी कलाकारांची आठवण काढायची कारण म्हणजे गणेश जयंतीनिमित रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मधील शिस्ते या गावच्या मुलांनी काढलेल्या रांगोळ्या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत. त्यातील योगेश चाळके याने श्री छत्रपती संभाजीराजांची काढलेली रांगोळी लोकांच्या अधिकच पसंतीस पडली आहे. शिवाय प्रथमेश कांबळे यांनी रेखाटलेली श्री छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी ही कौतुकाची थाप घेऊन जाते. सारंग भायदे आणि विवेक भायदे या जोडीने काढलेली शिस्ते गावची ग्रामदेवता आई जखमाता ची रांगोळीही व्हायरल झाली आहे. या सर्व मुलांवर सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
एक नजर मुलांनी काढलेल्या रांगोळ्यांवर....







Post a Comment