१ कोटी निधीतुन साकारलेल्या म्हसळा,श्रीवर्धन "आगरी समाज भवनाचे" 1 मार्चला होणार लोकार्पण .


 मेंदडी येथे केंद्रीयमंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे एकाच व्यासपीठावर येणार.

संजय खांबेटे म्हसळा

      शासनाच्या वेगवेगळ्या विकास निधीतून 18 गाव आगरी समाज अध्यक्ष माजी सभापती महादेव पाटील यांनी सर्वच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधी मार्फत सुमारे एक कोटींचा शासकिय निधी उपलब्ध करून म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथे म्हसळा-श्रीवर्धन 18 गाव आगरी समाजाचे भव्यदिव्य समाज भवन उभारले आहे.या भवनचे मोठया थाटामाटात उदघाटन सोहळा शुक्रवार दिनांक 1 मार्च 2019 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. 

२०१९ च्या लोकसभेचे दोन  प्रतीस्पर्धी  येणार एकाच व्यासपीठावर 

      उदघाटन कार्यक्रमाला केंद्रीय अवजड उद्योगमंत्री शिवसेना नेते अनंत गीते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस  व माजी मंत्री सुनिल तटकरे  एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना दोन दिग्ज नेते व  रायगड लोकसभेत परस्पर विरोधी उमेदवार निवडणुक लढविणार असल्याने त्यांची या कार्यक्रमाला उपस्थित सर्वानाच औत्सुक्याची वाटत आहे. या परिसरांत दोघांचेही मतदार मोठया प्रमाणात आहेत.

आगारी समाजाचे अध्यक्ष व नेते महादेव पाटील यांचा राजकीय पक्षांसमवेत झालेला प्रवास ठरणार महत्वाचा. 

आगरी समाजाचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी आपली राजकीय कारकीर्द  व वाटचालीत सेना,भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस  या पक्षात सक्रिय कार्य केले असल्याने त्यांचे प्रयत्नाने केंद्रीय अवजड उद्योग मंत्री ना.गीते आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांचे सह सर्वच राजकीय पक्षाच्या पुढारी मंडळीला एका व्यासपीठावर आणण्याचा योग जुळून आणला आहे. म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथे दिघी -पुणे या राष्ट्रीय महामार्गालगत मालकी हक्काच्या जागेत "म्हसळा श्रीवर्धन 18 गाव भव्य आगरी भवन "  बांधकामासाठी माजी मंत्री सुनिल तटकरे यांनी त्यांचे स्थानिक  विकास निधीं अंर्तगत  37 लक्ष रुपये,केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी 15 लक्ष रुपये,माजी आमदार तुकाराम सुर्वे यांनी 10 लक्ष रुपये,माजी खासदार रामशेठ ठाकुर,आमदार मनोहर भोईर,रायगड जिल्हा परिषदेच्या विकास निधींतून,दानशूर मंडळी आणि समाज लोकवर्गणीतून सुमारे एक कोटी रुपये खर्चाचे भव्यदिव्य आगरी भवन उभारण्यात आले आहे. हे " आगरी भवन "  या सर्वांच्या साक्षीने समाजाला लोकार्पण करण्यात येणार आहे.
        सर्वच दृष्टीकोनातून सुसज्ज असणाऱ्या या भवनात पाच हजार समाजबांधव एकत्रित बसतील असे भव्य समाज हॉल,व्यासपीठ,कार्यालय,व्यावसायिकसंकुल,ग्यालरी,
क्रीडांगण आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

         18 गाव समाज अध्यक्ष माजी सभापती महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या उदघाटन कार्यक्रमाला उदघाटक केंद्रीय मंत्री अनंत गीते, विशेष अतिथी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे,आमदार पंडितशेट पाटील, आमदार मनोहर भोईर,आमदार अवधुत तटकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे,उपाध्यक्ष आस्वाद पाटील,माजी आमदार तुकाराम सुर्वे,सेनेचे जेष्ठ पदाधिकारी महेंद्रशेट दळवी,राजीवशेट साबळे,उत्तमशेट कोळंबे,पक्ष प्रतोद मानसी दळवी,विरोधीपक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, आखील आगरी समाज संस्था अध्यक्ष सुर्यकांत पाटील, कर्णाळा स्पोर्ट उपाध्यक्ष रविशेट पाटील,उद्योगपती प्रकाश म्हात्रे,म्हसळा सभापती छाया म्हात्रे,श्रीवर्धन सभापती मिना गाणेकर,मेंदडी सरपंच राजेश्री कांबळे आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. या सामाजिक उपक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे जाहीर निमंत्रण अध्यक्ष महादेव पाटील,उपाध्यक्ष विष्णु धुमाळ,सचिव अनंत कांबळे, सह सचिव अनंत भायदे यांनी केले.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा