महादेव पाटील मित्र मंडळ आयोजित एस.एस.सी. व्याखान माला संपन्न...

महादेव पाटील मित्र मंडळ आयोजित एस.एस.सी. व्याखान माला : प्रश्नोत्तरे -शंकासमाधानाने वाढला विद्यार्थांतील टॅलेन्ट

प्रतिनिधी : म्हसळा 

      महादेव पाटील मित्र मंडळाने आयोजीत केलेल्या १०वी ( एस.एस.सी) व्याख्यान मालेत सहभागी झालेल्या  सुमारे १५० विद्यार्थानी व्याख्याना नंतर झालेल्या चर्चासत्र प्रश्नोत्तरे -शंकासमाधानाने विद्यार्थांतील टॅलेन्ट आयोजकांच्या लक्षांत आला तर शिक्षकाना समाधान वाटले. '
    सार्वजनिक  वाचनालयाचे हॉल मध्ये  महादेव पाटील मित्र मंडळाचे मुख्य उद्देशाने   झालेल्या या कार्यक्रमाला माजी सभापती महादेव पाटील शिवसेनेचे उपप्रमुख अनंत कांबळे, वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, अध्यक्ष अॅड मुकेश पाटील, केंद्र प्रमुख बी.आर.आडे, सचिन करडे, मनोहर पाटील, अंकुश गाणेकर, अंगत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
   मी पास होणारच या मुख्य हेतूने प्रेरीत होऊनच प्रश्नपत्रिका हातात घेयची असा गणित व इंग्रजी विषयाचे  गोरेगाव येथील ना.म. जोशी विद्यालयाचे तज्ञ मार्गदर्शक  दत्तात्रय बोराडे व जे. बी. सावंत हायस्कुल खरसईचे वसंत सातपुते यानी विद्यार्थाना  महत्वाची टीप्स देत .मूल्यमापन पद्धतीनुसार मार्गदर्शन करताना , प्रश्नपत्रिका हातात आल्यापासून शेवटचा प्रश्न सोडवेपर्यंत आत्म विश्वासाने सामारे जाण्याच्या बरोबरीनेच गणित , भूमिती व इंग्रजी बाबत महत्वाच्या टिप्स दिल्या दोनही सत्रानंतर झालेल्या चर्चासत्र, प्रश्नोत्तरे -शंकासमाधानाने विद्यार्थ्यांच्यात उत्कृष्ट टॅलेन्ट आसल्याचे आयोजकांच्या लक्षांत आले तर शिक्षकाना समाधान झाले . विद्यार्थ्यांच्यातील आत्मविश्वास  वाढत आसल्याचे दिसत होते. यावेळी भावेश गाणेकर, दिपेश पयेर, ज्योती म्हसकर . पल्लवी निंबरे, हर्षदा नाक्ती, तेजस्वी पारदुले या विद्यार्थ्यानी चर्चेत सहभाग घेतला. या शिबाराला खरसई, कोळवट, वरवठणे व म्हसळा हायस्कुलच्या विद्यार्थाचा सहभाग होता.


इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक  वसंत सातपुतेंचा विद्यार्थ्याना सल्ला,
" When you focus on your goal , you will lose the problem and when you focus on  problem  you will lose your goal "


महादेव पाटील मित्र मंडळातर्फे १०वी व १२ वी परीक्षा नंतर करीअर मार्गदर्शन विषयक कार्यशाळा घेण्यात येणार आहे. श्रीवर्धन म्हसळा तालुक्यात सामाजिक, आर्थिक , राजकीय बदल होत असताना विद्यार्थाना व्यावसायीक शिक्षणाकडे  केंद्रीत करण्याचा मंडळाचा विचार आहे. यापुढे उद्योगकीय समाज घडविण्यात मंडळ भूमिका घेणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या बौद्धिक व रचनात्मक प्रवृत्तीत वाढ होईल.
-अॅड . मुकेश पाटील , अध्यक्ष महादेव पाटील मित्र मंडळ.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा