दिघी - पुणे महामार्गाच्या भूसंपादनात शेतकऱ्यांवर अन्याय...

वडवली - वेळास गावचे शेतकरी संतप्त ; न्यायालयात दाद मागणार 

बोर्लीपंचतन : अभय पाटील
दीघी पुणे महामार्गाचे रुंदी करणाचे काम सुरू आहे याकरिता भुसंपादन व पुर्वी दिला गेलेला मोबदला याबाबत , श्रीवर्धनचे प्रांत अधिकारी यांनी वडवली येथे शुक्रवारी १ जानेवारी रोजी जनसुनावणी घेण्यात आली . मात्र , शेतकऱ्यांचे  समाधान न झाल्याने संभ्रमात पडलेल्या शेतकऱ्यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला असून , श्रीवर्धन म्हसळा तालुका शेतकरी संघटना मुईज शेख व सदानंद उर्फ पांड्या मामा खेऊर यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयात दाद मागणार आहेत . तर जागा देण्यास विरोध नाही . मात्र मोबदला मिळावा ही रास्त मागणी आहे . शासनाकडून दाखवण्यात आलेल्या पुराव्यावर केवळ सही व अंगठा आहे रेव्हछल स्टॅम्प नाही . यावर विश्वास कसा ठेवायचा , असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला . तर माझे बाबा शिकलेले असून ते सही करत होते मात्र ते १९७४ ला वारले पण १९८४ ला पैसे वाटप केले तिथे त्यांचा अंगठा दिसतोय अशी तक्रार संतोष पाटील यांनी केली . तर १९७९साली भूसंपादन के जी पी नुसार ( कजाप ) करण्यात आले . ६९ शेतकर्यांची ३ हेक्टर ३९ गुंठे ५ पॉईट ( वडवली गावातील ) संपादीत केलेल्या जमीनीचे २५ हजार ६२५ रूपये मोबदला देण्यात आल्याची माहिती महसूल खात्याने दिली . वडवली व वेळास गावचे शेतकरी यांस पूर्वीच मोबदला दिला गेला असे शासनाकडून वेळोवेळी सांगण्यात येत असल्याने शेतकर्यांनी याबाबत पुरावा किंवा पावती दाखवावी अशी मागणी केली होती . शनिवार २ फेब्रुवारी ठरल्या प्रमाणे शासकीय मोजणी भूमी अभिलेख खात्याकडून ( सर्वे ) होणार व हद्द कायम केली जाणार या कामी पोलिस सौरक्षण घेण्यात आलेले आहे . १८ मीटरचा रस्ता असून १८ ते २४ मीटरचे संपादन पूर्वीच्या करण्यात आलेले आहे नवीन संपादन केल्यास नवीन कायद्या नुसार नवीन बाजार भावाने मोबदला दिला जाईल अशी माहिती प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी दिली . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा