म्हसळ्यात मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरल्या : पोलीसांत तक्रार



संजय खांबेटे : म्हसळा
तालुक्यातील जांभूळ गावच्या हद्दीतील इंडस कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या २४ बॅटऱ्या चोरीस गेल्याचे घटनेची नोंद म्हसळा पोलीसांत झाली आहे. फिर्यादी मुरलीधर श्रीकांत मांडे वय ५३ ( रा.रातवड ता . माणगाव) यानी दिलेल्या फिर्यादी नुसार गु.र. नं.८/ २ ०१९ भा.द.वी. कलम ३ं७९ नुसार म्हसळा पोलीसानी घटनेची नोंद केली आहे. मांडे यानी २ फेबु २०१९ रोजी टॉवरच्या आवारात २४ बंद स्थितीतील अमर राजा कंपनीच्या बॅटऱ्या ठेवल्या होत्या त्या जागेवरून गायब झाल्याचे मांडे यांच्या १० फेब्रु २०१९ ला लक्षात आल्याने मांडे यानी आपल्या वरीष्ठ अधिकाऱ्याला विचारून बुधवार दिं .२७ फेब्रु २०१९ ला म्हसळा पोलीसांत तक्रार केली. सदर बंदस्थीतीतील बॅटऱ्या सुमारे रु २४ हजार किमतीच्या आसल्याचे ठाणे अमलदार मनिषा पाटील यानी 
सांगितले. सदर चोरीचा तपास अे.पी.आय. प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शना खाली पो.ना. राहुल सर्जेराव मोहीते करीत. आहेत.


म्हसळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व टॉवर कंपनीना टॉवर परीसर बंदीस्त करावा, टॉवरचे परीसरांत ( आत- बाहेर ) CC Tv कॅमेरे लावणे व चौकीदार नेमण्याबाबत समज अथवा सक्तीचे करण्यात येणार आहे .
-प्रविण कोल्हे. अे.पी.आय, म्हसळा पोलीस स्टेशन.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा