M.S.R.D.C च्या अडमुठ्या धोरणामुळे म्हसळा शहरात होते वाहतुक कोंडी


M. S.R.D. C च्या अडमुठ्या धोरणामुळे म्हसळा शहरात होते वाहतुक कोंडी ; नागरीक व पोलीसाना होतो मनस्ताप 
संजय खांबेटे : म्हसळा
    म्हसळा शहरांत दिवसें दिवस वाहतुक कोंडीमुळे जेष्ठ नागरीक, महीला ग्राहकवर्ग व अन्य सर्वानाच बाजार पेठेंत होणाऱ्या वाहतुक कोंडीचा प्रचंड त्रास होत आहे. ग्राहक वर्ग भिक नको पण कुत्रे आवर असे म्हणत विकास दिघी पोर्टचा त्रास मात्र म्हसळे करांना असेही सहज बोलतात.

वाहतुक व बाजारपेठेत झाली आहे लक्षणीय वाढ
    श्रीवर्धन, दिघी, हरीहरेश्वर, दिवेआगर, तुरुंबाडी या भागात जाणारे पर्यटक अगर व्यवसायीक सर्व वाहतुक म्हसळा शहरांतून जात असते . दिवसें दिवस सर्व प्रकारच्या वाहतुक दारांचे संखेत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. पूर्वी म्हसळा शहरांत केवळ ५०० ते ७०० मीटर क्षेत्रात म्हणजे पाभरे फाटा ते दिघी नाका अशी होती बाजारपेठ आता मात्र बाजारपेठेचे स्वरुप पूर्ण पणे बदलले आहे. आता इंडीयन ऑईल पंप ते दिघी नाका ते  पंचायत समीती, व दिघी नाका ते पाचगाव आगरी समाज येवढी सुमारे २ ते २.५ कि.मी. लांब येवढी व्याप्ती झाली आहे.
      म्हसळा शहराला व  वाहतुक कोंडींचा त्रास होऊ नये व वाहनाना ट्रॅफीक जॅमचा त्रास होऊ नये यासाठी शासनाने म्हसळा शहरा लगत आदीवासी वाडी, गौळवाडी ,नवा नगर  बायपास रस्ता केला आहे. सदरचा रस्ता माणगाव -दिघी या  राष्ट्रीय मार्गासाठी M. S.R.D. C. कडे वर्ग केला आहे . तो वाहतुकीस योग्य नसल्याने त्याचा वापर होत नाही. स्थानिक नगरपंचायत, पोलीस व  M. S.R.D. C. यांचा योग्य समन्वय नसल्याने नागरीक व पादचारी, ग्राहक , व्यापारी या सर्वानाच त्रास होत आहे.



वास्तविक पहाता म्हसळा शहरा लगत असणारा आदीवासी वाडी, गौळवाडी ,नवा नगर  बायपास रस्ता माणगाव -दिघी या  राष्ट्रीय मार्गासाठी M. S.R.D. C. कडे वर्ग केला आहे . तो रस्ता  M. S.R.D. C. ने तात्काळ दुरुस्त करून वापरला तर सर्वानाच होणारा वाहतुक कोंडीचा त्रास दुर होऊ शकतो. M. S.R.D. C. चे आधिकारी हेतूपुरस्कार रिपेअर करीत नाहीत . तो तात्काळ दूरुस्त करावा. अन्यथा सदर बायपास बांधकाम खात्याकडे वर्ग करावा.
-अशोक काते , अध्यक्ष प्रेस क्लब.


म्हसळा शहरांत पूर्वी ५०० ते ७०० मीटर क्षेत्रात बाजारपेठ होती  त्यावेळी  दोन वाहतुक पोलीस  होते आता २ ते २.५ कि.मी. बाजारपेठ झाली आहे  ट्रॅफीक पोलीसांची संख्या मात्र का वाढवत नाही . अनेक वेळा बाजारपेठेत होणारी वाहतुक कोंडी नागरीक अगर व्यापारीच मोकळी करतात.
-शाहीद उकये ,उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा