भारतीय प्रजासत्ताक दिन म्हसळ्यात प्रचंड उत्साहात साजरा
मुख्य शासकीय ध्वजारोहणासह सांस्कृतीक कार्यक्रमानी वाढविले प्रजासत्ताक दिनाचे महत्व
संजय खांबेटे : म्हसळा
भारतीय प्रजासत्ताक दिनी शासकीय मुख्य कार्यालयाचे ध्वजारोहण तहसीलदार रामदास झळके यांचे हस्ते कन्या शाळा पटांगणात,म्हसळा पंचायत समितीचे सभापती छाया म्हात्रे,म्हसळा नगर पंचायत नगराध्यक्षा फलकनाझ हुर्जुक, पोलीस ठाणे म्हसळाचे प्रभारी पीआय प्रविण कोल्हे, सार्वजनिक वाचनालयाचे ध्वजारोहण अध्यक्ष संजय खांबेटे, म्हसळा न्यु इंग्लिश स्कूलचे प्राचार्य बी.एन.माळी, प्राथमिक मराठी शाळा शिक्षण व पालक समितीच्या अध्यक्षा श्रीमती मयुरी बनकर,जिजामाता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महादेव पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसळा जि.प. सदस्य बबन मनवे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले . बहुतांश कार्यक्रमात बेटी बचाव - बेटी पढाव बाबत शपथ घेण्यात आली. तालुक्यातील सर्व प्राथमिक , माध्यमिक, ज्युनी कॉलेज , ग्रामपंचायती व अन्य शासकीय कार्यालयांत भारतीय प्रजासत्ताक दिनी शासकीय मुख्य कार्यालयाचे ध्वजारोहण तहसीलदार रामदास झळके यांनी,म्हसळा पंचायत समितीचे सभापती छाया म्हात्रे,म्हसळा नगर पंचायत नगराध्यक्षा फलकनाझ हुर्जुक,पोलीस ठाणे म्हसळाचे प्रभारी पीआय प्रविण कोल्हे,सार्वजनिक वाचनालयाचे ध्वजारोहण अध्यक्ष संजय खांबेटे,म्हसळा न्यु इंग्लिश स्कूलचे प्राचार्य बी.एन.माळी,प्राथमिक मराठी शाळा शिक्षण व पालक समिती अध्यक्षा श्रीमती मयुरी बनकर,जिजामाता शिक्षण संस्था अध्यक्ष महादेव पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसळा जि.प. सदस्य बबन मनवे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले .
मुख्य कार्यक्रमानंतर रा. जि.प. शाळा नं. १,न्यू इंग्लिश स्कुल, अंजुमन हायस्कुल, आयडीयल हायस्कूल, वसंतराव नाईक कॉलेज व अन्य विद्यार्थ्यानी समूह गीत, नृत्य, डांबेल्त्स, योगासने,कराटे, व विविध संस्कृतीक कार्यक्रम सादर करून उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांची करमणुक केली. या कार्यक्रमांतही तहसीलदार रामदास झळके व आयोजकानी स्पर्धात्मक मुल्यांकन करून सहभागी विद्यार्थ्यांचे पारीतोषक देऊन गुणगौरव केला.
यावेळी अंतुले उमामा नावीद, प्रणया खोत, या विद्यार्थ्यांचा व महसूल: जे.डी. मोरे, सचिन घोंडगे, गांवींदराव चाटे, पंचायत समिती : दामोदर दिधीकर, काशीनाथ नाक्ती, पोलीस स्टेशन : कमलाकर लक्कस, नगरपंचायत: अनंत भिकू कासारे, वन विभाग : रामकृष्ण कोसबे, कृषी विभाग: शिवाजी राठोड, भूमी अभिलेख : महेंद्र मोहीते, प्रकल्प अधिकारी ( अंगणवाडी ): श्रीमती आमिता कर्णिक, सामाजिक वनीकरण : पांडुरंग कांबळे या विविध खात्यांतील शासकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment