संजय खांबेटे : म्हसळा
फेसबुक, हॉटस अँप व अन्य साधने ही सोशल मिडायामध्ये अविभाज्य व आवश्यक घटक बनली आहेत. या सर्वांच्या वापराने जीवन व रोजचे रहाणीमान सुखकर होत असते परंतु आजचे तरुण जरुरीपेक्षा या माध्यमाच्या आहारी गेले आहेत,आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ वाया दवडीत आहेत. यातून भविष्यात शारीरीक व मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. इंटरनेट च्या या व्यसनातून मुक्त होण्यासाठी पालकांचे वर्तन, मार्गदर्शन, आणि भूमिकेला विशेष महत्व आहे. असे निष्पन्न" इंटरनेट अभिशाप का वरदान " या Happy Thoughts च्या परिसंवादात व्यक्त झाले.
आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष अजय दुधाणे, मनोविकार तज्ञ डॉ. अमोद बोरकर, मानसोपचार तज्ञ कल्याणी धोडके, पत्रकार नीता बरेलीकर या परिसंवादात सहभागी झाल्या होत्या. तेजज्ञान फॉउडेशनच्या विश्वस्त डॉ.तेजविद्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. माहीती तंत्रज्ञान क्षेत्रामुळे जीवन गतीमान व सुसह्य झाले तरी तंत्रज्ञानाचा योग्य वापर न होणे त्याचे आहारी जाण्याने विपरीत परिणाम होत असतो .विद्यार्थ्यांत सोशल मिडीयाचा होत असलेला प्रमाणाबाहेर वापर चिंता निर्माण करणारा आहे. अभ्यासासाठी विद्यार्थानी इंटरनेटचा वापर जरूर करावा परंतु त्याच्या आहारी मात्र जाऊ नये असे बहुतांश जणानी मत नोंदविले.

Post a Comment