मुरुड जंजिरा : प्रतिनिधी
मुरुडमधून श्रीवर्धनला जाण्यासाठी आगरदांडा बंदरातून जंगल जेटीची सोय झाल्यापासून पर्यटकांची वर्दळ वाढली आहे मात्र जेटीवर जाणार्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे गेली अनेक वर्षे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने ग्रामस्थांमधूनही नाराजी व्यक्त होत होती . यावर उपाय म्हणून महाराष्ट्र मेरीटाइम्स बोडने ५ कोटी खचून गावाबाहेरून समुद्रातून रस्ता बनवण्याचा निर्णय घेतला . त्यानुसार आता आगरदांडा बंदरातून जंगल जेटीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून यामुळे स्थानिकांसह पर्यटकांनाही मुरुडच्या निसर्गाचा आस्वाद घेत प्रवास सुखकर होणार आहे आगरदांडा जंगल जेटी झाल्यापासून श्रीवर्धन व तळ कोकणातील पर्यटक मुरुडकडे आपले वाहन घेऊन येऊ लागले . यामुळे मुरूडच्या पर्यटन विकासाला चालना मिळाली . पूर्वी छोट्या लॉन्चमधून फक्त मोटारसायकल घेऊन जाता येत होते व जाण्याच्या वेळा सिमित होत्या . आता रात्री ९ वाजेपर्यंत दिघीहून मुरुडला येता येते . आगरदांडा जंगल जेटीकडे जाणारा गावातील रस्त्याचीदेखील दुरवस्था झाली असल्याने त्याची दुरुस्ती होणेही गरजेचे आहे त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा ग्रामस्थांनी निवेदने देऊनही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटत आहे . आगरदांडा जंगल जंगल जेटीमुळे अनेक तालुके जोडले गेले . या जंगल जेटीमुळे पर्यटकांना आपली वाहने घेऊन जाता येत असल्याने पर्यटकांचा ओघ वाढला आहे या जंगल जेटीमुळे प्रवाशांच्या वेळेचीही बचत होत असून कटाळवाणा प्रवासही सुखकर होणार असल्याने पर्यटकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे आता खोरा बंदरातून मुंबईसाठी जलवाहतूक सुरु करावी , अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे

Post a Comment