प्रतिनिधी-सदानंद पयेर (मुंबई)
मुंबई मधील वडाळा विभागातील प्रसिद्ध गणेशनगर झोपडपट्टीतील आराध्य दैवत श्री गणेश मंदिर समिती विश्वस्त गेली अनेक वर्षे विविध उपक्रम राबवून जनतेची सेवा करत आहे.आजपर्यंत या रहिवाशी मंडळाने गणेश जयंती उत्सव ,होलिकोत्सव,कला क्रीडा क्षैक्षणिक हिंदू संस्कृतीचे विविध उपक्रम राबविते .श्री गणेश विद्यालयाच्या माध्यमातून मराठी दहावीपर्यंत व इंग्रजी माध्यमातून नववीपर्यंत शिक्षण घेत आहेत .या विद्यालयामध्ये वडाळा विभागातील अनेक मूलं विद्यार्जन करीत असून यामुळे मंडळाचे नाव अखंड वडाळा विभागात नावारूपाला आले.
श्री गणेश झोपडी सेवा मंडळ विश्वस्थ कार्यकारणी निवडणूक 13 जानेवारी 2019 मध्ये धर्मादायआयुक्त मुंबई यांनी घेतली.या निवडणुकीत नगरातील अनेक मात्तब्बर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले. निवडणुकीसाठी तीन पॅनल होते.1)गणेशनगर विकास पॅनल ,2)श्री समर्थ विकास पॅनलं 3)परिवर्तन पॅनल.अटीतटीच्या निवडणुकीत शेवटपर्यन्त कोणता पॅनल विजयी होईल हे सांगता येत नव्हते,अखेर गणेश विकास पॅनलला गणेशभक्त मतदार राजाने भरगोस मत देऊन विजयी केले.यामध्ये सर्वच्या सर्व चौदा उमेदवार जिंकून विश्वस्थ कार्यकारणी विजयी झाली.सर्व सभासदांनी व राहिवाश्यांनी उत्सुर्त सहभाग घेऊन शांततेच्या व खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक पार पाडली.
गणेशनगर विकास पॅनल चे विजयी उमेदवार
1)श्री.भिकाजी महाडिक - 907 मतं
2)श्री.प्रकाश महाडिक - 835 मतं
3)श्री.मोहन सागवेकर-835 मतं
4)श्री.रमेश भोईर- 828मतं
5)श्री.सुनील पावशे-821मतं
6)श्री.काशिराम खोत - 804 मतं
7)श्री.मनोहर सालावकार- 802 मतं
8)श्री.संतोष चाळके - 778 मतं
9)श्री.त्रिभोवन म्हात्रे- 769 मतं
10)श्री.गोविंद पाटील -764 मतं
11)श्री.आशिष चव्हाण -723 मतं
12)श्री.दीपक मिसाळ -723 मतं
13)श्री.सुधाकर मंचेकर-713मतं
14)श्री.सुहास ठाकूर - 710मतं

Post a Comment