श्रीवर्धन : भारत चोगले
श्रीवर्धन नगरपरिषदेने करोडो रूपये खर्च करून जलशुध्दीकरण केंद्राचे काम हाती घेतले आहे त्यामुळे आता श्रीवर्धन मधील नागरिकांना मुबलक स्वच्छ पाणी मिळणार आहे असा विश्वास नगर परिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे . श्रीवर्धन नगरीला पाणी पुरवठा रानवली धरणामधुन गेले ३५ ते ४० वर्ष केला जात आहे धरणावर रायगड पाटबंधारे विभाग कोलाड यांचा ताबा असल्याने दरवर्षी श्रीवर्धन नगरपालिका ज्या प्रमाणे श्रीवर्धन नगरीतील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो . त्या प्रमाणे या पाटबंधारा विभागाला पाणी पट्टी नगरपरिषदेकडून भरली जात असते . हा सिंचन धरण असल्याने त्यामधील पाण्याचा सिंचन सुध्दा होत असतो . श्रीवर्धन शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणापासुन ते श्रीवर्धन नगरीतील ग्राहकांपर्यंत ज्या पाईपलाईन मधुन पाणी मिळत असते . ते श्रीवर्धन मधील नागरिकांपर्यंत पोहचताना सध्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . हे पाईपलाईन फार जुन्या काळातील असल्यामुळे ते जीर्ण झाले आहे काही ठिकाणी गंज आले आहेत . तर काही ठिकाणी खराबही झाले आहे . त्यामुळे दरवर्षी रानवली धरणापासुन ते श्रीवर्धन नगरीतील काही भागामध्ये हे जीर्ण झालेले पाईप फुटले जातात . त्यामुळे हजारो लीटर पाणी तर वाया जाते शिवाय काही दिवस श्रीवर्धन मधील नागरिकांना पाणी पुरवठा बंद केल्याने पाण्यापासुन वंचित राहावे लागत असते . पाणी पुरवठा सुरळीत लवकरच चालु करण्यासाठी व फुटलेला पाईप काढून त्या जागी नवीन पाईप टाकण्यासाठी कर्मचाऱ्यांना अथक मेहनत घ्यावी लागत असते . राष्ट्रवादी कॉग्रसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे यानी सन २००४ साली निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांना जाहिरपणे सांगितले होते , आपण श्रीवर्धन मतदारसंघामधुन भरघोष मताधिक्याने निवडून आल्यावर श्रीवर्धन नगरपालिका अंतर्गत कोट्यवधी रूपये निधी उपलब्ध करून विविध प्रकारचे विकास कामे करेन आश्वासन दिले होते . दरम्यान गेले अनेक वर्षापासुन श्रीवर्धनला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन या जुन्या झाल्या असून त्या जीर्ण झाल्या आहेत . त्यामुळे श्रीवर्धन नगरीला पाणी पुरवठा करणाच्या रानवली धरणापासुन ते श्रीवर्धन शहरापर्यंत कित्येक किलोमीटर नवीन पाईप लाईन टाकु , शिवाय श्रीवर्धनवासीयांना मुबलक पाणी पुरवठा तर केला जाईल त्याचप्रमाणे जलशुध्दीकरण करून स्वच्छ पाणी मिळणार . तटकरे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्याच्या संकल्पनेनुसार १८ ते २० कोटी रूपये निधी बाबतचा प्रस्ताव दाखल झाला असून हा प्रस्ताव शासन दरबारी अतिंम टप्प्यात आहे त्यामुळे मे ते जुन अखेर पर्यत श्रीवर्धनच्या नगरीमध्ये मुबलक व स्वच्छ पाणी मिळणार यात काही शंकाच नाही असे श्रीवर्धन नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष जितेद्र सातनाक यांनी बोलताना सांगितले . सध्या श्रीवर्धन नगरपरिषद हद्दीत पाणी पुरवठेचा ओघ हा सुरळीत आहे प्रत्येक नागरिकांनी पाणी जपुन वापरा पाण्याचा गैरवापर करून नका . या वर्षी जरी पाऊस कमी पडला असला तरी सुध्दा पाण्याचा प्रमाण आज व्यवस्थित आहे लवकरच पाणी पुरवठा बाबत बैठक लावली जाणर असुन जुन अखेर पर्यंत पाणी श्रीवर्धनच्या नागरिकांना कसे पुरवता येइल या बाबत योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे . पाण्याचा गैरवापर करणाऱ्यावर तसेच पाण्याची चोरी करतांना आढळल्यास त्याच्यावर ठोस अशी कारवाई केली जाईल . आज पर्यत श्रीवर्धन नगरपरिषदेने ८ ते १० पाणी चोरी करणाऱ्यांवर कारवाई केली असून त्याच्या मोटारसुध्दा जप्त केलेल्या आहेत . पाण्याची पातळी घरसलेली नाही , आज पाण्याचा ओघ सुरळीत आहे . नागरिकांनी सुध्दा प्रतिसाद देणे अत्यंत महत्वाचे आहे

Post a Comment