- आम्हाला"मतदार असल्याचा अभिमान मतदानासाठी सज्ज"
- संजय खांबेटे : म्हसळा
- नवव्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने आज दिं.२५ जानेवारीला म्हसळ्यात जनजागृती व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील वसंतराव नाईक कॉलेज, न्यू इंग्लीश स्कुल , अंजुमन हायस्कुल म्हसळा या कॉलेज मधील विद्यार्थांचे सहभागाने अंजुमन हायस्कुल ते कन्या शाळा या परीसरांत रॅलीने जनजागृती करण्यात आली . तहसीलदार रामदास झळके यांच्या नेतृत्वा खाली निघालेल्या रॅलीत अे.पी.आय. प्रविण कोल्हे,नायब तहसीलदार के.टी भिंगारे , निवडणूक ना.तहसीलदार मोरे , वसंतराव नाईक कॉलेजचे प्र.प्राचार्य मच्छींद्र जाधव, नायब तहसीलदार के.टी भिंगारे , निवडणूक ना.तहसीलदार मोरे न्यू इंग्लीश स्कुलचे एस.के. पाटील, अंजुमन हायस्कुलचे बिजापूरे, अस्लम सरखोत, प्राथमिक शिक्षण विभागाचे दिपक पाटील, गोवींदराव चाटे, संतोष तावडे, सचीन घोंडगे, अमर ठमके, श्रीमती लिमकर,सरिता आईनकर,दिपक चव्हाण आदी सहभागी झाले होते. यावेळी गोवींदराव चाटे यानी विद्यार्थी व उपस्थितां कडून मतदान नोंदणी व मतदान हक्क बजावणेबद्दल शपथ घेतली .झळके यानी आजच्या दिवस हा निवडणूक आयोग ,नवीन मतदारांसह सर्व मतदारांसाठी महच्वाचा आहे. आज ९वा राष्ट्रीय मतदार दिन आसल्याचे सांगीतले .
- राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व , प्रसार व प्रचार होण्याच्या अनुषंगाने विविध प्रसार माध्यमांजवळ संर्पक साधावा , तसेच महीला, युवक, अपंग, जेष्ठ नागरिक, सेनादलातील मतदार याना कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे असे शासनाचे परिपत्रक असूनही याना कोणतीही कत्पना देण्यात आली नव्हती .

Post a Comment