राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त श्रीवर्धनमध्ये कार्यक्रम


श्रीवर्धन : प्रतिनिधी
भारत निवडणुक आयोगाच्या सुचनेप्रमाणे तहसील कार्यालय श्रीवर्धन निवडणुक शाखेमार्फत २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये सकाळी मतदार जागृतीच्या घोषणा देत र . ना . राऊत उच्च माध्यमिक विदयालय व तालुक्यातील इतर शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीव्दारे मतदारांना मतदानाचे कर्तव्य बजाविण्याचे आवाहन केले . एस . एन . डी . टी कॉलेज श्रीवर्धन मध्ये युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले यात कॉलेजच्या सर्व विद्यार्यांनी निवडणुकांमध्ये जात , धर्म , वंश , भाषा निरपेक्ष व कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याची शपथ घेतली . सर्व शासकीय कार्यालय स्तरावर कार्यक्रम आयोजित केलेले आहेत . त्यामध्ये कार्यालय प्रमुख यांच्याकडून मतदान करण्याची शपथ घेण्यात आली . तसेच श्रीवर्धन मधील शाळा व महाविदयालय स्तरावर वंचित न राहो कोणी मतदार या संकल्पनेवर आधारित निबंध स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या . या स्पर्धामधील विजेत्यांना उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन प्रविण पवार , व नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले . यावेळी मतदार नोंदणी अधिकारी प्रविण पवार यांनी सर्व मतदारांना आपले मतदानाचे कर्तव्य बजाविण्याचे आवाहन केले . श्रीवर्धन तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा