श्रीवर्धनचा आमदार बनवलेत आता एकदा खासदार बनन्याची संधी द्या केंद्रातुन निधी कसा आणता येतो व विकास कामे कशी करता येतात दाखवुन देतो. : माजी मंत्री सुनिल तटकरे
अनंत गीते फुटकी कवडी निधी न आणता खासदार निधी खर्च करण्यात अव्वल भासवुन स्वताची पाठ थोपटुन घेत आहेत : माजी मंत्री सुनील तटकरे
श्रीवर्धन ( विजय गिरी) राष्ट्र्वादी काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्र्ीय चिटणीस माजी मंत्री सुनिल तटकरे श्रीवर्धन तालुक्यच्या दौऱ्यावर आले होते या वेळी त्यांच्या हस्ते निगडी गौळवाडी येथील समाज मंदिर बोर्ला येथील समाज मंदिर अंतर्गत रस्ताा व वडशेत वावे येथे पक्ष प्रवेश कार्यक्रम सपन्न झाले या कार्यक्रमात बोलताना तटकरे म्हणाले की,2009 साली श्रीवर्धन विधान सभा मतदार संघात पहील्यांदाज निवडणुक लढवताना या भागातुन प्रतिनिधीत्व करण्याची फक्त एकदाच संधी द्या तुम्हाला मागे वळुन बघण्याची वेळ येणार नाही अशी विनंती केली होती.त्या वेळेस आपण संधी दिलीत या संधीमुळेच श्रीवर्धनचा कायापालट करण्यात आपण यशस्वी झालो. श्रीवर्धनचा आमदार बनवलेत आता एकदा खासदार बनन्याची संधी द्या केंद्रातुन निधी कसा आणता येतो व विकास कामे कशी करता येतात दाखवुन देतो अवाहन केले. यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष महमदभाई मेमन,तालुका अध्यक्ष दर्शनभाई विचारे,उपाध्यक्ष अमित खोत,युवक अध्यक्ष सिध्दार्थ कोसबे,महीलाअध्यक्षा ज्योती परकर,अजित भाटकर,निलेश येलवे,समीर बनकर,सदानंद सावंत एम.जी.पवार,चंद्रकांत गीजे आदी मान्यवर उपस्थीत होते.पुढे बोलताना तटकरे म्हणाले की, अनंत गीते फुटकी कवडी निधी न आणता खासदार निधी खर्च करण्यात अव्वल भासवुन स्वताची पाठ थोपटुन घेत आहेत,श्रीवर्धन तालुक्यातील अनेक गावे विरोधी पक्षाकडे होती.विकास कामे न झाल्याने ही गावेची गावे राष्ट्र्वादी काॅंग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत.वडशेत वावे येथील पक्ष प्रवेश कार्यक्रमात प्रवेश कर्ते एम.जी.पवार यांनी आपल्या मनोगतात येथील ग्रामस्थ अनेक वर्षे बाभळीच्या झाडाला पाणी घालुन फळाची अपेक्षा करीत होते.आता साक्षात फळे देणाऱ्या झाडाला पाणी घालणार असे म्हटले हाच धागा पकडुन तटकरे म्हणाले की फळे देणारे झाड कोणते आणी बाभळीचे झाड कोणते हे आपल्या लक्षात येवुन आपण राष्ट्र्वादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे याचा आनंद आपल्याला झाला असुन या गावातील पाणी योजनेसाठी जि.प.अध्यक्षा अदिती तटकरे यांच्या माध्यमातुन येत्या आठ दिवसात 15 लाख रुपये देण्याचा शब्द दिला.वडशेतवावे येथील धरणाच्या कामाला चालना देण्याचे काम सुनिल तटकरेच करणार असे सांगुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेली राजघटना सत्तेत बसलेले लोक बदलु पाहत आहेत.जनतेची कामे करण्यास आपण वचनबध्द असल्याचे सांगितले.निगडी येथे बोलताना तटकरे साहेब म्हणाले की, गावतील पाण्याची सोय लवकरात लवकर केली जाईल तसेच अतंर्गत रस्ताा येत्या मे पर्यंत पुर्ण झालेला असेल.येत्या 26 तारखेला आपण परत श्रीवर्धन मध्ये येत असुन त्यावेळी वीजमंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन या गावातील वीज समस्या पोल याचा निकाल लावल्याशिवाय श्रीवर्धन सोडणार नसल्याचे सांगितले.माझी बांधीलकी सर्वसामान्य जनतेशी आहे.सध्याच्या परीस्थीतीत आपल्या कडे कुठलेही पद नाही तरी हा सुनिल तटकरे जनतेसाठी व विकास कामांसाठी कुठल्याही परीस्थीतीत मागे पडणार नाही.बोर्ला येथे बोलताना तटकरे साहेब म्हणाले की,बोर्ला गावात 6 वर्षापुर्वी आलो होतो,त्या वेळेस काही लोकांकडुन वेगळे राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला,तरी सुध्दा ग्रामस्थ राष्ट्र्वादी काॅंग्रेस पक्षासोबत ठाम राहीले याचा अभिमान आहे.श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक गावागावात अनेक समस्या होत्या.या समस्या राष्ट्र्वादी काॅग्रेस पक्षाच्या माध्यमातुन सोडवण्यात आपण यशस्वी झालो आहोत.केंद्रात मंत्री असलेल्या येथील खासदारांना स्वता दत्तक घेतलेल्या दिवेआागर गावात विकास करता आला नाही. या गावात जास्तीत जास्त विकास कामे राष्ट्र्वादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आल्याने दिवेआगराच्या ग्रामस्थांनी ग्रामंचपायत राष्ट्र्वादी काॅंग्रेस पक्षाच्या ताब्यात दिली आहे.विकास कामे रोजगार निर्मीतीवर करायची आहेत. विकास अशा पध्दतीने केला जाईल की गावातील नोकरी चाकरी निमित्त शहरात स्थंलातरीत होणारे लोंढे थांबले जातील.एकत्रीतपणे समाजपरीवर्तनाचे काम करायचे आहे.विकास हाच आमचा ध्यास विकास हीच आमची जात असे शेवटी सांगीतले. वडशेतवावे येथील मधुकर सावंत,एम.जी पवार,अवधुत सावंत,पुंडलीक म्हामुणकर,जान्या सावंत,सुरेश पंेढारी,संजय सापटे,अकुश पवार,अमोल सावंत,तुशार सावंत,चंद्रकात मोरे,मनोहर राणे,संतोश शेडगे यांच्या सह महीला ग्रामस्थांनी राष्ट्र्वादी काॅग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला

Post a Comment