२ वर्षांसाठी ५० लाख निधी प्राप्त तरीही रस्ते दगड - मातीचे...



गावात रस्ता नसल्याने एसटी नाही ; विद्यार्थ्यांची पायपीट कायम 
म्हसळा : महेश पवार
तालुक्यात लाखो रुपये खर्च करूनदेखील ग्रामीण भागातील रस्त्यांची आजही दुरवस्था आहे तालुक्यात गावोगावी जाण्यासाठी जि . प . सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या मालकीचे असणारे रस्ते नादुरुस्त आहेत . सा . बां . मार्फत ज्या रस्त्यांची दुरुस्ती केली आहे तीदेखील निकृष्ट दर्जाची आहे नादुरुस्त रस्त्यांमुळे अनेक गावातील एसटी सेवा बंद करण्यात आल्या आहेत . त्यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे . म्हसळा तालुक्याची रचना पाहता डोंगरदरीत गावे वसली आहेत . तालुक्यात ८४ गावे , वाड्या वास्तव्याला आहेत . मात्र अनेक गावे - वाड्यांमध्ये अद्यापही चांगल्या दर्जाचे रस्ते नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय कायम आहे तालुक्यातील काही रस्ते सुधारण्याचे प्रयत्न सा. बा. विभागाकडून केले गेले . मात्र ठेकेदारामार्फत निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने काही महिन्यातच या रस्त्यांची पुन्हा दुरवस्था झाली आहे अनेक गाव - वाड्यांमध्ये आजही दगड - मातीचे रस्ते असल्याचे पाहायला मिळत आहे. नादुरुस्त रस्त्यांमुळे गावातील एसटी सेवा बंद झाल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे. तालुक्यातील बागाची वाडी चिरगाव व अन्य गावात आजही रस्ता नाही . एखादा आजारी रूग्ण हातावर उचलून आणण्याची वेळ आजही निर्माण झाली आहे. रस्ते नसल्याने एसटी सुविधा नाही . खासगी वाहने चौपट रकम घेऊन सेवा देतात . वेळ आली , तर त्याच रस्त्याने पायपीट करित प्रवास करावा लागत आहे शाळेतील विद्यार्थी आजही ४ किमी . चालत प्रवास करतांना दिसत आहेत . या खडतर प्रश्नावर मार्ग काढण्याची राजकीय मंडळींची मानसिकता नाही , असा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे . सर्वच गावात रस्ते सुधारले तर विकास होण्यास चालना मिळेल . म्हणूनच विकास साध्य करण्यासाठी प्रथम रस्ते होणे गरजेचे आहे . गेल्या २ वर्षात तालुक्यातील रस्त्यांसाठी ५० लाखांपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात आला . मात्र तरीदेखील सा . बां . विभागाला रस्ते दुरुस्तीसाठी निधी अपुरा पडत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे . तर दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधी व राजकीय पक्ष श्रेयवादामध्ये अडकल्याचे दिसून येते . तालुक्यातील ग्रामीण भागातील काही रस्त्यांचे दोन वेळा दोन वेगवेगळ्या पक्षांमार्फत भूमिपूजन करण्यात आले आहे मात्र तरीदेखील आज त्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे . त्यामुळे लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या उदासिनतेमुळे ग्रामस्थांना त्रास सहन लागत करावा आहे 


बागेची वाडी, चिरगाव अद्यापही रस्त्यापासून वंचित...
तालुक्यातील बागेची वाडी चिरगाव हा गाव म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसले आहे . पण गावनिर्मितीपासून गावामध्ये रस्ता तयार करण्यात आलेला नाही . रस्ता नसल्याने २ वर्षांपूर्वी एका रुग्णला दवाखान्यात हातावर उचलून नेत असताना त्याचा मृत्यू झाला . विद्यार्थ्यांना आजही ४ . किमी ची पायपीट करावी लागत आहे ग्रामीण भागातील रस्त्यांची तात्पुरती डागडुजी जाते केली . मात्र त्यामुळे हे रस्ते पुन्हा नादुरुस्त होत आहेत . त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले   आहे .  

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा