महाराष्ट्रात २६४, रायगड ९० तर म्हसळयात ४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर : आचार संहीता सुरु ; २४ फेब्रुवारीला मतदान व २५ फेब्रु. मतमोजणी
संजय खांबेटे : प्रतिनिधी
माहे मार्च २०१९ या कालावधीत मुदती समाप्त होणाऱ्या राज्यातील २६४, रायगड जिल्ह्यातील ९० तर म्हसळा तालुक्यातील ४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे . या मध्ये तालुक्यातील रोहीणी, गोंडघर, खामगांव व खारगांव ( बु ) यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात आज गुरुवार दिं.२४ जाने.पासून आचार संहीता सुरु झाली आहे . ती मतमोजणी पर्यत रहाणार आहे..मतदान रवीवार दिं .२४ फेब्रुवारी रोजी आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायं ५.३० पर्यंत आहे. मतमोजणी सोमवार दिं.२५ फेब्रु .रोजी होणार आहे.सरपंच पदाची थेट निवडणूक होणार आसुन पुढील प्रमाणे आरक्षण आहे. खामगाव, गोंडघर, खारगांव ( बु) ( नागरिकांचा मागास प्रवर्ग) व रोहीणी ( सर्वसाधारण स्त्री) असे सरपंच आरक्षण आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे प्रसीद्धी शुक्र दिं.२५ फेब्रु. नामनिर्देशनपत्र भरणे सोम .दिं .४/२ /१९ ते ९/२ / १९, छाननी सोम. सोम ११ / २ / १९ (स .११ ), अर्ज मागे घेणे बुध. दि. १३ / २/१९ दुपारी ३वा.पर्यत, चिन्ह वाटप त्याच दिवशी दु. ३ वाजे नंतर. मतदान रवीवार दिं .२४ फेब्रुवारी रोजी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायं ५.३० पर्यंत

Post a Comment