म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा
न . पं . च्या विषय समित्या जाहीर झाल्या असून पाणी पुरवठा सभापतीपदी माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे तर सा . बां . सभापतीपदी माजी उपनगराध्यक्ष नासीर दळवींची निवड करण्यात आली आहे . नुकतेच निवड म्हसळा नगरपंचायतीच्या विषेश समित्यांची निवड करण्यात आली . या निवडीमध्ये म्हसळा न . पं . पहिले नगराध्यक्ष तथा बांधकाम सभापती दिलीप कांबळे यांची पाणी पुरवठा सभापदीपदी तर माजी उपनगराध्यक्ष नासीर दळवी यांची निवड करण्यात आली आहे शिक्षण सभापतीपदी मारूती पवार , स्वच्छता सभापती पदी संजय कर्णिक , महिला व बालकल्याण सभापतीपदी सेजल खताते तर पर्यटन सभापती पदी मांडावकर यांची निवड करण्यात आली . गटनेतेपदी नगरसेवक सुभान इकबाल हळदे यांची निवड करण्यात आली . पाणी , स्वच्छता व बांधकाम सभापतीपदी दिलीप कांबळे , संजय कर्णिक व नासीर दळवी यांच्यासारख्या अनुभवी व जाणकार नगरसेवकांची निवड झाल्याने या समस्या हे नगरसेवक आपल्या अनुभवाने सोडवतील म्हणजे शहराचा खऱ्या अर्थाने विकास होईल , अशी भावना जनसामन्य माणासांमधून उमटू लागली आहे.

Post a Comment