सर्फराज दर्जी : बोर्ली पंचतन
रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असले दिघी गावात विकसीत होत असलेल्या दिघी पोर्टच्या हुकूमशाही कारभारा विरोधात शिवसेनेने उपोषणाचे हत्यार उचलेले आहे.जाणीवपूर्वक स्थानिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्षित करणाऱ्या दिघी पोर्ट प्रशासनाच्या निषेधार्थ आपल्या प्रलंबित असणाऱ्या मागण्या, स्थानिक तरुणीची भरती करणे, पोर्ट अंतर्गत असणाऱ्या कंपन्यांमध्ये कामांचे ठेके स्थानिकांना मिळावे, बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देणे, ट्रेलर चालकांकडून घेणारे अनधिकृतपणे घेणारे 100 रुपये बंद करावे व ट्रेलर चालकां चेंजिंग रूम ची व्यवस्था करणे ,या मागण्या पूर्ण करण्यासाठी शिवसेना प्रणित अवजड वाहतूक सेनेच्या संघटनेच्या वतीने वाहतुक सेना राज्य सचिव नरेशजी चाळके व श्रीवर्धन तालुका अध्यक्ष सुकुमार तोंडलेकर आणि महिला कार्यकर्त्या निशा पाटील मागण्या मान्य होई पर्यंत 26 जानेवारी दुपारी 3 वाजता देण्यासाठी दिघी पोर्टच्या गेट समोर अमरणउपोषणाला बसले आहेत.
जो पर्यंत दिघी पोर्ट प्रशासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तो पर्यंत आम्ही दिघी पोर्टच्या एकही अवजड वाहनांची वाहतूक करून देणार नाही- रवि मुंडे(शि.जिल्हा प्रमुख)
26 जानेवारी च्या निमित्ताने आम्ही शांतपणे दिघी पोर्ट प्रशासना विरोधात उपोषण करतोय, नाहि तर शिवसेना स्टाईल ने केला असता
-नरेश चालके(महाराष्ट्र राज्य अवजड वाहतुक सचीव).
एखादी आमची माता भगिनी जर ह्या दिघी पोर्ट मधून फाट्यांची मुळी घेऊन येत असली तर तीच्या कडून 50 ते 500 रूपए घेण्यात येतात,दिघी पोर्टच्या ह्या गळतान कारभारचा आमच्या उपोषणच्या माध्यामातून आम्ही जाहीर निषेध करतो, आणि आमच्या स्थानिक लोकांच्या रोजगाराचा , किंवा माझ्या कोळी बांधवांची समस्या दुर होत नाही ,व आमच्या इतर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा उपोषण परत घेणार नाही
- सुकुमार तोंडलेकर (श्रीवर्धन तालुका अवजड वाहतुक अध्यक्ष).
ह्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इंद्रजीत सिंह बल( महाराष्ट्र राज्य अवजड वाहतुक अध्यक्ष),
बोबी भाटीया( महाराष्ट्र राज्य अवजड वाहतुक उप अध्यक्ष ).सुजीत तांदळेकर,प्रतोष भाई कलथरकर(शि.ता.प्रमुख),नंदु शिर्के(म्हसळा अवजड वाहतुक अध्यक्ष), पिंट्या वेश्विकर, संदेश म्हसकर,नंदकिशोर भाटकर,शब्बीर उँड्र,मसूद दर्जी ,लाईक दर्जी यांनी सहभाग घेतला तसेच तालुक्यातील सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी व जनतेनी पाठिंबा दिला आहे.


Post a Comment