म्हसळा : महेश पवार
तालुक्याची पाण्याची मूळ समस्या काही अंश दूर झाली असली तरी ग्रामीण भागामध्ये आजही पाण्याची स्थिती समाधान कारक नसल्याचे चित्र आजही दिसत आहे शासनाने प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाला मुबलक आणि वेळेत शुद्ध स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे यासाठी शासनाने आजपर्यंत शेकडो योजना राबविल्या . मात्र आजही म्हसळा तालुका तहानलेला असल्याचे चित्र आहे स्वजल धारा , पतदर्श , भारत निर्माण , राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना , मुख्यमंत्री ग्रामीण योजना , जलस्वराज्य टप्पा २ अशा योजना तयार करून अधिकारी , ग्रामपंचायती , ग्रामस्थांच्या सुसंवादातून ह्या योजना करण्यात आल्या . परंतु , त्या योजना घोणसे , निवाची वाडी , घोणसे विचारेवाडी , सुरई , बौद्धवाडी , देवघर कोंड , मेंदडी कोंड , तोंडसुरे प्रादेशिक खामगाव गौळवाडी , पाभरे , म्हसळा , म्हसळा गौळवाडी या गावात समिती संथ गतीने काम करित असल्यामुळे योजना आजही अपुर्या आहेत . त्यामुळे अनेक वाड्यांमध्ये ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागत आहे अनेक गावांमध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात होते . यासाठी टंचाईग्रस्त गावातील योजना पूर्ण करणे , संबंधित योजनेला पूरक करणे , योजनेची विशेष दुरुस्ती करणे , वापरात असणाच्या विंधन विहिरी दुरुस्त करणे , स्थानिक विहिरी अहिग्रहित , करणे असे विविध पर्याय वापरल्यानंतर संबंधित गाव - वाड्यांना करने पाणी पुरवठा करण्याचे समितीच्या माध्यमातून सुचविण्यात आले मात्र उपलब्ध योजना अद्यापपर्यंत रखडल्याने ग्रामीण भागामध्ये टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत . म्हसळा तालुक्यात टंचाईच्या समस्यांवर मात करण्यासाठी शासनातर्फ तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार २०१८ - १९ - निविदा स्तरावर भारत निर्माण व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ह्या गोंडघर मोहल्ला , तुर्बाडी , काळसुरी , सुरई मोहल्ला , खारगाव खु . , मांदाटने , केलटे बाऊळ कोंड , सोनघर , रेवली , वाडंबा , कोंझरी , ठाकरोली , पानवे , लिपनी वावे या गावात आज सुरू आहेत . म्हसळा तालुक्यात सुरू असलेल्या योजना म्हसळा गौळवाडी , चिराठी , दुर्गवाडी , डोरजे , कुडतुडी , कुडतुडी गौळवाडी , देवघर , खारगाव खु , पाभरे , निगडी , कांदळवाडा तोंडसुरे प्रादेशिक , खरसई , मेंदडी कोंड , गोंडघर , वाडंबा , जांभूळ , केलटे , पानवे , कोंझरी , आडी , नेवरूळ , घूम , रुद्रबट , कोकबन , सालविंडे बागचीवाडी , भापट , चिखलप , देहेन , वांगणी , कणघर , खामगाव , कृष्णनगर , लेप , वाघाव , लेप गौळवाडी , वाघाव गौळवाडी अशा ३८ गावांमध्ये योजनांचे काम सुरू आहे परंतु , तरीदेखील पाण्याची टंचाई कायम आहे पाणी साठा वाढावा म्हणून शासनांनी कोटी वृक्षलागवडीचा संकल्प हाती घेण्यात आला . त्याचप्रमाणे पाणी अडवा , पाणी जिरवासारख्या योजना राबविण्यात आल्या . . श्री . नानासाहेब धर्माआधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांनीदेखील विहिरीतील गाळ काढण्यासारखे उपक्रमदेखील म्हसळा तालुक्यात राबविले आहेत . मात्र तरीदेखल तालुक्यात पाण्याची टंचाई भासत आहे
तालुक्यात ३८ गावात पाण्याच्या योजना...
म्हसळ गौळवाडी , चिराठी , दुर्गवाडी , ढोरजे , कुडतुडी , कुडतुडी गौळवाडी , देवघर खारगाव खु . , पाभरे , निगडी , कांदळवाडा , तोंडसुरे प्रादेशिक , खरसई , मेंदडी कोंड , गोंडघर , वाडबा , जांभूळ , केलटे , पानवे , कोंझरी , आडी , नेवरूळ घूम , रुद्रवट , कोकबन , सालविंडे , बागचीवाडी , भापट , चिखलप , देहेन , वांगणी , कणघर , खामगाव , कृष्णनगर , लेप , बाघव लेप गौळवाडी , वाघाव गौळवाडी .
टंचाईग्रस्त गावांसाठी १८ . ६ लाखांची तरतूद..
तालुक्यातील ८ गावे व २३ वाड्यांचा टंचाई आराखड्यात समावेश करण्याचे समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रायगड यांना कळविले आहे . सदर समितीत आमदार सभापती , तहसीलदार , गटविकास अधिकारी व ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता हे सदस्य आहेत तालुक्यातील ८ गावे व २३ वाड्यांना टंचाई परिस्थीतीवर मात करण्यासाठी शासनाने रु १८ . ६ लाखांची तरतूद केली आहे.
आराखडा २०१८ - १९ नुसार ई - निविदा स्तरावर निर्माण व राष्ट्रीय ग्रामीण पियेजल योजना ह्या गोंडघर मोहल्ला , तुर्बाडी , काळसुरी , सुरई मोहल्ला , खारगाव खु , मांदाटने , केलटे बाऊळ कोंड , सोनघर , रेवली , वाडंबा , कझरी , ठाकरोली , पानवे , लिपनी वावे या गावात आज सुरू होणाच्या मार्गावर आहे .

Post a Comment