पोलीस रेझींग डे साजरा करताना म्हसळा पोलीसानी युवा शक्तीला केले फोकस.


संजय खांबेटे, म्हसळा
    म्हसळा पोलीस स्टेशनच्या माध्यमाने २ जाने. २०१९ ते ८ जाने. २०१९  या कालावधीत साजरा केलेला " पोलीस रेझींग डे" हा दरवर्षी पेक्षा विशेष महत्वाचा व अभ्यासू ठरला. या कालावधीत म्हसळा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रविण कोल्हे यानी आपले कर्मचारी व तालुक्यातील विविध खात्यांचे मुख्य अधिकाऱ्यासमवेत इयत्ता ९ वी ते कॉलेज विद्यार्थ्याना विशेष लक्ष केले होते.तालुक्यात  या सप्ताहातील कार्यक्रमाला तहसीलदार रामदास झळके, गट विकास अधिकारी वाय. एम. प्रभे, परिक्षेत्र वनअधिकारी निलेश पाटील, गट शिक्षण अधिकारी संतोष शेडगे, वसंतराव नाईक कॉलेजचे प्राचार्य  राघव राव, न्यू इ्लीश स्कुलचे प्राचार्य माळी , अंजुमन हायस्कुलचे  प्राचार्य खान व सह कर्मचारी पोउनि ढुस, शेख, पो.हे.कॉ. प्रमोद कदम, पो.ना. शामराव कराडे, वैभव पाटील,म.पो.ना .स्वनाली पवार,पो. शि. रावजी राठोड, कमळाकर लक्क्स ,अभयदादा कळमकर, मनोहर तांबे आदींचा विशेष सहभाग होता. 
        अेपीआय कोल्हे यानी  कार्यक्रमांत  २ जानेवारी १९६१ रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलीस दलाचा ध्वज समारंभपूर्वक प्रदान केला होता. तेव्हापासून २ जानेवारी दिवशी महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझींग डे साजरा केला जातो. या काळात प्रत्येक पोलीस स्टेशन विविध व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर विशेष लक्ष केंद्रित करीत असल्याचे सांगितले, म्हसळा पोलीसानी  देशाचा भावी , सकारात्मक, सदृढ व सशक्त नागरिक घडविण्यासाठी विविध उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. त्या दृष्टीने जनजागृती, पोस्टेशनच्या कार्यभारात विद्यार्थी , नागरीक सहभाग, पोलीस ठाण्यांतील हत्यारे हाताळणे असे कार्यक्रम तसेच विद्यार्थी वर्गासाठी मुला- मुलीना कायद्याचे प्रबोयन स्त्रिया ना व मुलीना असणारे कायद्याचे सरक्षण या बाबत सविस्तर माहीती व चर्चेतून प्रश्नोत्तरे, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्था, मुलींसाठी कराटे प्रशिक्षण , स्पर्धा परिक्षा प्रोत्साहन कार्यक्रम असे  सप्ताहांत विद्यार्थी जिवनातून युवाशक्ती घडविण्यासाठी बहुविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी खामगाव , मेंदडी, खरसई, येथील व म्हसळा शहरातील  सर्व कॉलेज ,हायस्कुत व प्राथमिक शाळांतून विविध उपक्रम घेऊन जनजागृती करण्यात आली.म्हसळा येथील  कराटेच्यापियन्  अर्जुन जंगम, पपु राजपूत विजया डोके  ह्या तज्ञ शिक्षक मंडळीनी कराटेचे मार्गदर्शन व विद्यार्थीना कराटे शिक्षकाचे महत्व कसे याबाबत मार्गदर्शन केले, अभिजीत कलमकर, आदित्य कलमकर ,किरण राजपूत शशांक मशाळे, मलिका तांबे ,मयूर तांबे ,आर्यन तांबे , माहेश्वरी  येलवे यानी प्रात्यक्षिके सादर केली.

"तालुक्यातील विविध खात्यांचे मुख्य अधिकारी , कॉलेज ,हायस्कुल, प्रा शाळा असा सर्वसमावेशक कार्यक्रम व इयत्ता ९ वी ते कॉलेज विद्यार्थ्याचा  विशेष  सहभाग यामुळे कार्यक्रम विशेष प्रभावी झाला"
-रामदास झळके, तहसीलदार म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा