ऐतिहासिक "मदगड" किल्ला दुर्लक्षित ; अवशेषांची शोधयात्रा करणे कमालीचे कठीण



प्रतिनिधी म्हसळा Live
पुरातत्व विभागाकडून आजतागायत दुर्लक्षित व प्रशासनाच्या उदासिनतेचे उदाहरण म्हणजे श्रीवर्धन तालुक्यातील वांजळे येथील ऐतिहासिक वनदुर्ग 'मदगड ' किल्ल्याची उपेक्षा कशी झाली ? हे या ठिकाणी गेल्यावर कळते आहे तालुक्यामध्ये वेगवेगळी ठिकाणे आपल्या वेगळेपणासाठी आणि सुंदरतेसाठी लोकप्रिय झाली आहेत . त्यातील एक आहे मदगड . चौदाव्या शतकातील मदगड हा एकमेव किल्ला श्रीवर्धन तालुक्यात येतो . दिवेआगरहून बोर्लीच्या मागच्या मदगडच्या डोंगरावरून वांजळे मार्गे पायवाटेने म्हसळयाकडे रस्ता जातो . त्याच्या अलीकडे डावीकडे फुटणारी पायवाट मदगडकड़े नेते . आता इथे फारसे काही शिल्लक नसले तरी सभोवतालचा मोठा परिसर इथून दिसतो.
बोर्लीपंचतन जाऊन गाडी मार्गाने वांजळे येथून मदगड माथ्यावर तासाभरात पोहोचता येते . मदगडची उंची २९२ मीटर आहे . माथ्यावरुन दिवेआगरचा समुद्र किनारा दिसतो . मदगडला 'मतगड' असेही संबोधतात मदगडचे शिवकालीन संदर्भ नाहीत . पण बाणकोटच्या खाडीपासून म्हसळे खाडीपर्यंत पसरलेल्या सागरी किनाऱ्यापर्यंत व त्यालगतच्या प्रांतातील एकमेव गड असल्याने टेहळणीच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो . मदगडच्या पायथ्याशी वांजळे गाव आहे . वांजळे गावापर्यंत पक्का गाडी रस्ता आहे हा संपूर्ण प्रदेश डोंगरदन्यांनी व्याप्त असल्याने चारही बाजूनी हिरवळ या ठिकाणाच्या सौंदर्यात भर पाडतात . यामुळे प्रवास आनंदमय होतो . 
गावातून वाटाड्या घेणे आवश्यक आहे. जंगली प्राण्यांच्या भितीमुळे दुर्गमित्रांनी खबरदारी घेणे महत्वाचे आहे गडावरील दाट झाडी व हिंस्र प्राण्याचे भय यांमुळे अवशेषांची शोधयात्रा करणे कमालीचे कठीण आहे मदगडा फारसे दुर्गमित्र जात नसल्याने गडा विषयी व अवशेषांविषयी अभ्यासनीय माहिती उपलब्ध नाही . गडाबाबतचे ऐतिहासिक मोजकेच संदर्भ व हरवलेले दुर्ग अवशेष यांचे संकलन करून 'मदगड ' च्या ऐतिहसिक आठवणींना उजाळा देण्याचे काम दुर्गमित्रांपुढे आहे गडावरील नामशेष व उपलब्ध असणाच्या वास्तू पाहताना गेली कित्येक वर्षे गड बेबसाऊ आहे हे दिसते . 

संशोधनाची गरज....
गड - किल्ल्यांची अवस्था सध्या दिवसेंदिवस बिकट होत आहे . गड किल्ले वाचवण्यासाठी विविध संघटनेतर्फ दुर्गसंवर्धनाची मोहीम हातात घेण्यात आली आहे बोलपंचतन येथील आम्ही युवक यामध्ये सहभागी होत . गेली सात वर्षे मदगड येथे श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवत आहोत . गडाविषयी व अवशेषांविषयी अभ्यासनीय माहिती उपलव्य नसल्याने संशोधनाची गरज आहे.
- नंदकिशोर भाटकर दुर्गप्रेमी , बोर्लीपंचतन

पर्यटन हे कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. श्रीवर्धन तालुका पर्यटन म्हणून प्रसिद्धीस असताना पुरातत्व विभागा कडून आजतागायत मदगड हे वनदुर्ग दुर्लक्षित आहे ‘मदगड' पर्यटन स्थळ प्रसिद्ध व्हावे , अशी मागणी आहे.
-सुभाष धुमाळ वांजळे , रहिवासी 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा