म्हसळा वनविभागाचे मदतीने साळवींडे ग्रामस्थांची पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम यशस्वी.



म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
  संयुक्त वन व्यवस्थापन समिती साळवींडे देवळाचीवाडी ग्रामस्थांनी रोहा वनविभाग म्हसळा परिक्षेत्राचे मदतीने श्रमदानातून टंचाईचे कालात सुमारे 10 हजार लिटर पाणी साठेल एवढया क्षमतेचा गावाशेजारील नदीपात्रात वनराई बंधारा बांधून शासनाचे 'पाणी अडवा पाणी जिरवा' मोहिमेस  सुरवात केली आहे. 
परिमंडळ वनाधिकारी बाळकृष्ण गोरणाक, वनरक्षक भीमराव सुर्यतल यांचे मार्गदर्शन घेऊन साळवींडे ग्रामस्थांनी वनराई बंधारा बांधकाम करण्यासाठी 250 मातीबंद पिशव्यांच्या मदतीने पाणी साठवण बंधारा दिवसभरात पुर्ण केल्याचे जांभुळ बिट वनरक्षक सुर्यतल यांनी माहिती दिली व वनराई बंधाऱ्याचे महत्त्व ग्रामस्थांना विषद केले. बांधण्यात आलेल्या या पाणी साठवण बंधाऱ्याचा उपयोग ग्रामस्थ शेतकरी, वन्यजीव आणि पशुपक्षी यांना पिण्यासाठी होणार आहे. रोहा वनविभाग उपवनसंरक्षक आर.शेपट, सहाय्यक वनसंरक्षक श्री गोडबोले, म्हसळा परिक्षेत्र वनाधिकारी नरेश पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्याने तालुक्यात मोठया लोकवस्ती असलेल्या गावांत वनविभागाच्या सर्व प्रकारच्या शासनाच्या योजनांंचा लाभ दिला जात असल्याने ग्रामस्थ आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा वन विभागाबाबत विश्वास वाढला आहे या मुळे वृक्षतोड कमी होऊन वनसंरक्षन, वृक्षलागवड, वन्यजीव संरक्षण कामांत वाढ होत असल्याचे परिमंडळ वनाधिकारी बाळकृष्ण गोरणाक यांनी माहिती देताना सांगितले. साळवींडे संयुक्त वन ग्राम समितीचे उत्कृष्ट कामाचे चीज व्हावे यासाठी वनविभाग जांभुळ बिट मार्फत या समितीला संत तुकाराम महाराज वन ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे वनरक्षक भीमराव सुर्यतल यांनी सांगितले. बंधारा बांधकाम करणे कामी वन समिती अध्यक्ष महादेव तावडे, समाजसेवक रामशेठ पारदुले, लक्ष्मण शिंदे, पांडुरंग सातम, गाव अध्यक्ष मोहन भुवड, अर्जुन भुवड, जगदीश पाटील आणि सुमारे100 ग्रामस्थ महिला मंडळाने सहभाग घेतला होता. साळवींडे ग्रामस्थांनी वनराई बंधारा बांधण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल म्हसळा वनविभागाने त्यांना धन्यवाद दिले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा