संजय खांबेटे : प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील चार ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना मध्ये थेट लढत होणार आहे.तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शेकापची अघाडी आहे . तर शिवसेनेला काँग्रेसची साथ आहे . खामगांव, रोहीणी व गोंडघर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी कडे तर एकमेव खारगाव बु. ग्रा पं सेनेकडे आहे.तालुक्यात लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस - शेका अघाडी घट्ट होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडील एकही ग्रामपंचायत शिवसेना घेईल ही शक्यता सुद्धा नसल्याचा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. या ऊलट शिवसेनेतील अंर्तगत गटबाजी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. त्याचा फटका खारगाव बु. ग्रा पं. होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेना खामगाव ग्रामपंचायतीला विशेष लक्ष करणार आहे. या उलट राष्ट्रवादी कॉंग्रेस आपणाकडील तीनही ग्रामपंचायती राखत खारगाव ( बु ) ग्रामपंचायतीत कडवी लढत देऊन ताब्यात घेण्याची व्यूह रचना करीत आहेत. सरपंच पदाची थेट निवडणूक होणार आसुन पुढील प्रमाणे आरक्षण आहे. खामगाव, गोंडघर, खारगांव ( बु) ( नागरिकांचा मागास प्रवर्ग) व रोहीणी ( सर्वसाधारण स्त्री) असे आरक्षण आहे.
"चार ग्रामपंचायती पैकी खारगांव ( बु) व गोंडघर या दोन ग्रामपंचायतीत कॉंग्रेस धार्जीणे थोडे फार मतदार आहेत. ते शिवसेनेला किती साथ देणार का निष्ठेने राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबतच रहाणार यावर शिवसेनेचे भवितव्य आहे."
-राजकीय निरीक्षक.
" शिवसेना व भाजपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आंबेत प्रमाणे गोंडघरला होणार नाही आम्ही राष्ट्रवादी, शेकापच्या अघाडीत सामील होऊ."
-निष्ठावंत कॉंग्रेसी

Post a Comment