● नेवरूळ गाववस्तीलगत बैलाला केले ठार..
● गोधनाचे नुकसान भरपाईसाठी म्हसळा वनविभागाकडे अर्ज
म्हसळा : वार्ताहर
३० किमी . विस्तार असलेल्या म्हसळा तालुक्यातील जंगल भागात वाघ जातीतील बिबट्यांचा संचार आहे हे बिबटे गाव परिसरात चारा खाण्यासाठी गेलेल्या पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांना ठार मारण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत . तालुक्यात बिबट्याचे हल्ल्यात एका शेतकऱ्याला जखमी केल्याची व अनेक शेतकऱ्यांच्या गोधनाची नुकसान झाल्याची आणि नुकसान ग्रस्तांना वनविभागाने योग्य भरपाई दिल्याची नोंद झाली आहे. तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्यात बैलाला ठार मारण्याची घटना ३० जानेवारी रोजी नेवरूळ येथील महिला शेतकरी लिला हरी पागार यांच्या मालकीचा बैल गावालगतच जंगल भागात चरण्यासाठी गेला असता त्याच्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे घटनेची लिलाबाई यांनी म्हसळा वनविभागात लेखी तक्रार करून झालेल्या गोधनाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी वनक्षेत्रपाल एन . डी . पाटील यांचेकडे लेखी अर्ज केला आहे . बिबट्याने बैल मारल्याची घटनास्थळी जावून पहाणी व रितसर पंचनामा म्हसळा वनपाल सुधाकर थळे , बनरक्षक बनसोडे यांनी केली आहे तालुक्यात ५५९१ . ०४० हेक्टरवर वनविभागाचे क्षेत्र आहे या क्षेत्रात बिबट्यांचा संचार आहे . दरवर्षी म्हसळा तालुक्यात बिबट्याचे हल्यात ४ ते ५ गोधनाचे नुकसान होत असल्याची नोंद म्हसळा वनविभाग कार्यालयात होते . १ एप्रिल २०१४ ते ४ डिसेंबर २०१८ पर्यंत वनविभाग म्हसळा हद्दीत शेतकर्यांच्या पशुधनाच्या ऑनलाईन नुकसानीच्या १४ घटना घडल्या आहेत . तर ऑफलाईनच्या १५ पैकी १४ गोधनाचे नुकसानीची म्हसळा वनविभागाचे माध्यमातून योग्य तो वैद्यकीय पंचनामा व तपासणी करुन संबंधीत शेतकर्यांना त्यांचे गोधनाचे रु . ७८०७५ एवढी नुकसान भरपाई देण्यात आली आहे बिबट्याचे हल्ल्यात गंभीर जखमी केलेल्या शेतकर्याला म्हसळा वनविभागाचे माध्यमातून १ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिल्याचे कोसबे यांनी माहिती देताना सांगितले .

Post a Comment