म्हसळयाची आरोग्य व्यवस्था सलाईनवर ; म्हसळा ग्रामिण रुग्णालयाला कायम स्वरुपी व शाश्वत अधिक्षक - वैयकिय अधिकारी मिळावा : महादेव पाटील यांची मागणी

                                         


संजय खाबेटे म्हसळा
   म्हसळा तालुक्यात ८१ गावे लोकसंख्या ६१ हजार ५४६ त्याना आरोग्य सेवा पुरविणारी यंत्रणा एक ग्रामिण रुग्णालय, तीन जिल्हा परिषदेची प्रा.आरोग्य केंद्र, एक जि.प. दवाखाना अशी यंत्रणा परंतु नाव मोठे लक्षण खोटे अशी आरोग्याची स्थिती आहे, आरोग्य सेवा पुरविणाऱ्या महत्वाच्या घटकात  ग्रामिण रुग्णालयासाठी १ वैद्यकिय अधिक्षक व ३ वैद्यकिय अधिकारी ही सर्व पदे रिक्त, तालुक्यात तीन जिल्हा परिषदेची प्रा.आरोग्य केंद्र  आवश्यक  तालुका वैद्यकीय अधिकारी १ पद,६ वैद्यकिय आधिकारी असताना ५ पदे रिक्त आहेत. म्हसळा येथे ग्रामिण रुग्णालय सुरू झाले  म्हणून प्रा.आ. केंद्रातील सेवा खंडीत आहे . तालुक्यातील एक नगर पंचायत, ३९ ग्रामपंचायत हदीतील जनतेला सद्यस्थितीत  कायम स्वरुपी खामगाव प्रा .आ.केंद्रात एकच डॉक्टर आहे. अशी तालुक्याची केवीलवाणी आरोग्य व्यवस्था आहे. शासनानेच तालुक्याची आरोग्य यंत्रणा हेतूपुरस्कर दुबळी केली असल्याचा महादेव पाटील यांचा दावा आहे.

       तालुक्या साठी असणाऱ्या ग्रामिण रुग्णालया साठी १ वैद्यकिय अधिक्षक व ३ वैद्यकिय अधिकारी ही रिक्त पदे २६ जाने. पूर्वी तात्काळ भरावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती महादेव पाटील यानी शासनाकडे केली आहे. अन्यथा पाटील उपोषणाचा मार्ग स्विकारणार आहेत.
        उपसंचालक आरोग्य, ठाणे, जिल्हाशल्य चिकीत्सक  आलिबाग ह्या दोघानीही म्हसळ्याची आरोग्य सेवा डळमळीत व्हावी म्हणून ग्रामिण रुग्णालय जसवली येथे कार्यरत असणारे डॉ.मधुकर ढवळे यांच्याकडे उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन व ग्रामिण रुग्णालय म्हसळा अशा दोन ठीकाणचा कार्यभार देऊन आरोग्य सेवेचे खऱ्या अर्थाने तीन तेरा वाजविले .  याच कासकीर्दीत नवशिकाऊ व प्रभारी वैद्यकिय अधिकारी म्हसळा येथे काम करीत असताना किमानं २-३ अभ्रके दगावली अशाने राज्य शासनाचा  "निरोगी महाराष्ट्राचा संकल्प " पूर्ण होईल का ? असा पाटील यांचा आरोग्य विभागाला सवाल आहे.


१२ ऑक्टो २०१८ रोजी काळसुरी  येथील गरोदर महीलेचे अभ्रक दगावल्याची रितसर तक्रार जिल्हाधिकारी , जिल्हा शल्य चिकीत्सक,रायगड, व म्हसळा पोलीसांत करूनही निगरगट्ट शासनाने कोणतीच दखल  का घेतली नाही असा पाटील यांचा थेट प्रश्न आरोप आरोग्य विभागाला आहे.


गेले अनेक वर्षे उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन  व ग्रामिण रुग्णालय जसवली अशा सेवा करणाऱ्या  डॉ.मधुकर ढवळे यांना  ग्रामिण रुग्णालय म्हसळ्याच्या अधिक्षक पदी नेमावे अशा मागणीसाठी म्हसळा येथून एक शिष्टमंडळ राज्याचे बांधकाम व आरोग्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार असल्याचे सांगण्यात आले.





Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा